जकार्ता येथे सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारतासाठी महिला फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये ५० किलो वजनी गटात विनेश फोगटने सुवर्णपदकाची कामगिरी केली. हे भारताचे एशियन गेम्स २०१८मधील दुसरे तर महिला कुस्तीमधील पहिले सुवर्णपदक आहे.
अंतिम सामन्यात फोगटने जपानच्या युकी इरीला ६-२ने पराभूत केले. तसेच फोगटने २०१४ आणि २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण तर २०१४च्या एशियन गेम्समध्ये कांस्यपदक पटकावले आहे.
भारताचे हे कुस्तीमधील दुसरे सुवर्णपदक आहे. कालच (१९ ऑगस्ट) पुरूषांच्या ६५ किलो वजनी गटात बजरंग पुनियाने सुवर्णपदक जिंकले. त्याने जपानच्या टाकाटानी दाइचीला ११-८ असे पराभूत केले होते.
अशाप्रकारे भारताचे एशियन गेम्समध्ये एकूण ५ पदके झाली आहेत. यामध्ये २ सुवर्ण, २ रौप्य आणि एक कांस्य पदकाचा समावेश आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
–एशियन गेम्स: लक्ष्यने मिळवून दिले भारताला दुसरे रौप्यपदक
–एशियन गेम्स: नेमबाज दिपक कुमारला रौप्यपदक