इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये १५ वर्षाच्या शार्दूल विहानने भारताला नेमबाजीत रौप्यपदक जिंकून दिले. पुरूषांच्या दुहेरी ट्रॅपमध्ये त्याने ७३ शॉट्स मारत हे पदक पटकावले आहे.
यावेळी ३४ वर्षीय कोरियाचा शिन ह्युनवूने विहानवर एका गुणाने आघाडी मिळवत सुवर्णपदक पटकावले. तर कतारचा अल मारी हमदला ५३ गुणांसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
विहान पात्रता फेरीत १४१ गुण मिळवत अव्वल स्थानावर होता. तर त्याचा संघसहकारी अंकूर मित्तल १३४ गुणांसह नवव्या स्थानावर होता. मॉस्के २०१७च्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये विहान सहाव्या स्थानावर होता.
WHAT A STAR!
At 15 YEARS, Shardul Vihan, one of our youngest in #AsianGames2018, has made us immensely proud with a silver in Double Trap Shooting.
His prowess convinces me that the future of Indian sports is in VERY safe hands! #KheloIndia #IndiaAtAsianGames @asiangames2018 pic.twitter.com/nSh6K8mXto
— Col Rajyavardhan Rathore (Modi Ka Parivar) (@Ra_THORe) August 23, 2018
तसेच महिलांच्या दुहेरी ट्रॅपमध्ये भारताची निराशा झाली आहे. यामध्ये श्रेयसी सिंग १२१ गुणांसह ६व्या तर वर्षा वर्मन १२० गुणांसह ७व्या स्थानावर राहिल्या.
विहान हा उत्तर प्रदेश मधील मेरठचा रहिवासी आहे. याआधी मेरठच्याच १६वर्षाच्या सौरभ चौधरीने २१ ऑगस्टला पुरूषांच्या १० मीटर एयर पिस्टलमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे.
भारताने एशियन गेम्समध्ये एकूण १७ पदके जिंकली असून नेमबाजीतील आज जिंकलेले हे आठवे पदक आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स: भारतीय टेनिसपटू अंकिता रैनाने जिंकले कांस्यपदक
–विराट कोहलीचा कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा डंका