---Advertisement---

एशियन गेम्समधील कांस्यपदक विजेता खेळाडू विकतोय चहा…

On: शनिवार, सप्टेंबर 8, 2018 7:10 PM
---Advertisement---
एशियन गेम्समध्ये भारताने उत्तम कामगिरी करत ६९ पदके पटकावली. यामध्ये १५
सुवर्णपदकांचा समावेश आहे. हे भारतीय विजेते घरी परत आल्यावर त्यांना विविध राज्य
सरकारांनी बक्षिसांची रक्कम जाहिर केली.
यातील कांस्यपदक विजेता सेपॅक टेकरॉव संघातील हरीश कुमार मात्र त्याच्या रोजच्या कामावर रूजू झाला आहे ते म्हणजे चहा विकणे. दिल्लीमध्ये हरीशच्या वडीलांचे चहाचे दुकान आहे. त्यांना मदत व्हावी म्हणून हरीश येथे काम करतो.
“माझे कुटुंब खुप मोठे आहे पण उदरनिर्वीहासाठी पैसे कमी पडत असल्याने मी बाबांना त्यांच्या
चहाच्या दुकानात मदत करतो”,असे हरीश म्हणाला.
“दिवसातील चार तास मी खेळाचा सराव करतो. भविष्यात मला चांगली नोकरी करून
कुटुंबाला मदत करायची आहे”, असेही तो पुढे म्हणाला.
तसेच तो या खेळात कसा आला याविषयी माहिती दिली. “२०११पासून मी हा खेळ खेळायला सुरूवात केली. मला टायरसोबत खेळताना माझे प्रशिक्षक हेमराज यांनी पाहिले. त्यांनीच मला या खेळाची ओळख करून दिली आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडे नेले. तेथून मला महिन्याचा खर्च आणि खेळाचे किट मिळाले.”
हरीशच्या कुटुंबाला रोजच्या अन्नासाठी फार कष्ट घ्यावे लागतात. तर सरकारने मुलाला
केलेल्या मदतीचे त्याच्या आईने आणि भावाने आभार मानले.

 

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कूक आणि टीम इंडियाचे नाते खास…शेवटच्या सामन्यातही मोठा पराक्रम

एबी डिविलियर्स खेळणार पाकिस्तान सुपर लीगमध्ये!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment