इंडोनेशियामध्ये सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये भारताला सिपॅक टॅकराव या खेळात पहिले पदक मिळवले आहे. या खेळात भारताच्या पुरुष संघाने कांस्यपदक मिळवले आहे.
त्यांना उपांत्य फेरीत थायलंडकडून 2-0 असा पराभव स्विकारावा लागला आहे. उपांत्य फेरीतील दोन्ही सामन्यात पराभूत होणाऱ्या संघांना कांस्यपदक दिले जाणार आहे.
त्यामुळे भारताने या खेळात उपांत्य फेरीत प्रवेश करत कांस्यपदक निश्चित केले होते. परंतू त्यांना अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले.
भारताने या स्पर्धेची सुरुवात चांगली केली होती. त्यांनी पहिल्या सामन्यात इराणला 2-1 असे पराभूत केले होते. मात्र दुसऱ्या सामन्यात भारताला इंडोनेशियाकडून 2-0 ने पराभूत व्हावे लागले होते.
भारताच्या पुरुष संघाने जरी पदक मिळवले असले तरी मात्र महिला संघाकडून निराशा झाली आहे. त्यांना गटफेरीतील सर्व तीन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
महिला संघाला कोरियाकडून 3-0, लाओजकडून 2-1 आणि थायलंडकडून 3-0 असा पराभव स्विकारावा लागला आहे.
भारताला आत्तापर्यंत 9 पदके मिळाली असून यात कुस्तीमध्ये दोन, नेमबाजीमध्ये 6 आणि सिपॅक टॅकरावमध्ये 1 पदक मिळाले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स: नेमबाजीत भारताला पहिले सुवर्णपदक
–केवळ ६ धावा आणि क्रिकेट जगतातील सर्वात खास विक्रम कोहलीच्या नावे
–भारतीय महिला कबड्डी संघाचा आशियाई स्पर्धेत विजयी चौकार, साक्षी कुमारीचा अष्टपैलू खेळ