एशियन गेम्समधील भारतीय पथकाचे उपसंचालक आरके संचेती हे इंडोनेशियातून परतताना विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये तर खेळाडू इकॉनॉमी क्लासमध्ये बसून आले.
यातील काही भारतीय अॅथलेटिक्संना याबाबत कोणताच आक्षेप नव्हता कारण काही अधिकारीही त्यांच्यासोबत इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करत होते.
“मला इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करण्यास कोणतीच अडचण नाही, पण या बाबतीत दुजाभाव का? कारण ते आमच्यामुळेच येथे आहेत”, असे एका भारतीय व्हॉलीबॉल संघाच्या खेळाडूने सांगितले.
मी माझ्या हवाई मैलचा (एयर माईल्स अपग्रेड) वापर करून बिझनेस क्लासमध्ये प्रवास केला, अशी सफाई संचेती यांनी दिली.
“आम्ही इकॉनॉमी क्लासमधूनच प्रवास करणार होतो पण आम्ही आमच्या हवाई मैलचा (एयर माईल्स अपग्रेड) वापर करून बिझनेस क्लासमध्ये प्रवास केला”, भारतीय बॉक्सिंग संघटनेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
या घटनेची दखल भारतीय क्रिडा मंत्रालयाने घेतली होता. यामध्ये असे समोर आले की त्या अधिकाऱ्यांनी स्वखर्चातून तो प्रवास केला.
भारताने या 18व्या एशियन गेम्समध्येचांगली कामगिरी केली आहे. यामध्ये भारताने एकूण 69 पदके जिंकली असून यात 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य पदकांचा समावेश आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स: ब्रिजमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना अजुनही मिळाले नाही भारताचे अधिकृत ब्लेझर








