जकार्ता येथे सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये नेमबाज संजीव राजपूतने मंगळवारी(21 आॅगस्ट) भारताला एकूण 8 वे पदक मिळवून दिले आहे. त्याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात रौप्य पदक मिळवले.
संजीवने या स्पर्धेत 452.7 गुण मिळवत दुसरे स्थान मिळवले आहे. तर चीनच्या ह्यू झीचेन्गने 453.3 गुणांसह अव्वल स्थान मिळवत सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर जपानच्या मात्सुमोटो टाकयुकीने 441.4 गुण मिळवत कांस्यपदक मिळवले.
संजीवने 10.3 पॉइंटचा शॉट मारत मिळवत अंतिम तीन नेमबाजांमध्ये स्थान मिळवले होते. त्याला शेवटच्या शॉटवर 10.4 पॉइंटचाच शॉट मारता आल्याने त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
संजीवने याआधी गोल्ड कोस्ट येथे झालेल्या 2018 राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. तर 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य तर 2006 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते.
याबरोबरच त्याला 2006 च्या एशियन गेम्समध्ये याच स्पर्धेत त्याला कांस्यपदक मिळाले होते.
संजीवबरोबरच मंगळवारी सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा यांनी पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत अनुक्रमे सुवर्णपदक आणि कांस्यपदक मिळवले आहे.
भारताला आत्तापर्यंत 9 पदके मिळाली असून यात कुस्तीमध्ये दोन, नेमबाजीमध्ये 6 आणि सिपॅक टॅकरावमध्ये 1 पदक मिळाले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–केवळ ६ धावा आणि क्रिकेट जगतातील सर्वात खास विक्रम कोहलीच्या नावे
–लारा, ब्रॅडमन, पाॅटींग… सर्वांचे विक्रम किंग कोहलीने मोडले
–भारतीय महिला कबड्डी संघाचा आशियाई स्पर्धेत विजयी चौकार, साक्षी कुमारीचा अष्टपैलू खेळ