---Advertisement---

सुनील छेत्रीने जिंकलं 140 कोटी भारतीयांचं मन, Asian Games 2023मध्ये संघाला मिळवून दिला पहिला विजय

On: गुरूवार, सप्टेंबर 21, 2023 4:55 PM
Sunil-Chhetri
---Advertisement---

आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 स्पर्धांना सुरुवात झाली आहे. भारतीय संघ क्रिकेट असो किंवा फुटबॉल दोन्ही खेळात चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. या स्पर्धेतील पहिला विजय सुनील छेत्री याच्या नेतृत्वातील भारतीय फुटबॉल संघाच्या पारड्यात पडला आहे. भारताने बांगलादेशला पराभवाचा धक्का दिला आहे. यापूर्वी चीनविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, बांगलादेशविरुद्ध भारताने जबरदस्त पुनरागमन केले. या सामन्यात भारताने बांगलादेश संघाला 1-0ने पराभूत केले.

भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) सामन्यात गोलसाठी चांगलीच झुंज पाहायला मिळाली. मात्र, भारताकडून कर्णधार सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने अखेरच्या क्षणी केला. या गोलमुळे भारतीय संघ बांगलादेशचा धुव्वा उडवण्यात यशस्वी झाला. विशेष म्हणजे, हा एकमेव गोल सुनीलने 85व्या मिनिटाला केला. भारतीय फुटबॉल संघ (Indian Football Team) आपला मागील सामना चीनविरुद्ध, तर बांगलादेश संघ म्यानमारविरुद्ध पराभूत झाला होता.

पहिल्या हाफमध्ये सामना बरोबरीत
या सामन्यादरम्यान दोन्ही संघाचे खेळाडू सुरुवातीपासूनच गोल करण्यासाठी धडपड करत होते. मात्र, कोणालाच यश मिळाले नाही. भारत-बांगलादेश संघाचे खेळाडू सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये गोल करू शकले नाहीत. भारतीय संघाने दुसऱ्या हाफमध्ये शानदार खेळाचे दर्शन घडवले. यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी गोल करण्याची अनेक संधी मिळाली. परंतु या संधीचा फायदा घेण्यात ते अपयशी ठरले. या सामन्याच्या सुरुवातीला जवळपास 20 मिनिटे बांगलादेशच्या खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी शानदार पुनरागमन केले.

सुनील छेत्रीचा गोल
आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पहिल्या सामन्यात भारतीय फुटबॉल संघाने यजमान चीनला आव्हान दिले होते. मात्र, या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, बांगलादेश संघ आपल्या पहिल्या सामन्यात म्यानमार संघाविरुद्ध पराभूत झाला होता. अशाप्रकारे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा होता. मात्र, बांगलादेश या सामन्यात एकही गोल करू शकला नाही आणि भारतीय संघाने गोल करत विजय साकारला.

एकेवेळी असे वाटत होते की, सामना गोल न होता बरोबरीत सुटेल. मात्र, सामन्याच्या 85व्या मिनिटाला सुनील छेत्रीने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. सुनीलने गोल पेनल्टी कॉर्नरवर केला.

आता भारतीय संघाचा स्पर्धेतील पुढील सामना रविवारी (दि. 24 सप्टेंबर) म्यानमारविरुद्ध सायंकाळी 5 वाजता आहे. (asian games 2023 football india beat bangladesh sunil chhetri ind vs ban know here)

हेही वाचाच-
कॅप्टन छेत्री बनला बापमाणूस! पत्नी सोनमने दिला पुत्ररत्नाला जन्म
अर्रर्र…! संघाच्या अध्यक्षानेच महिला फुटबॉल खेळाडूला सर्वांदेखत केलं किस, डिलीट व्हायच्या आत पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---