Loading...

आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या बजरंग पुनियाचे सुवर्णयश

आज(23 एप्रिल) जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणारा भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनीयाने आशियाई कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. तो या स्पर्धेत यावर्षी पहिले सुवर्णपदक मिळवणारा भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.

त्याने चीनमधील झीआन येथे चालू असलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये फ्रिस्टाईल 65 किलो वजनी गटात अंतिम लढतीत कझाकस्तानच्या सायातबेक ओकासोवला 12-7 अशा फरकाने पराभूत करत हे सुवर्णपदक जिंकले आहे.

त्याचबरोबर 79 किलो वजनी गटात भारताच्या प्रविण राणाने रौप्यपदक आणि 97 किलो वजनी गटात सत्यव्रत कादियानने कांस्य पदक जिंकले आहे.

बंजरंगला अंतिम सामन्यात सुरुवातीला संघर्ष करावा लागला होता. तो ओकासोव विरुद्ध 2-5 असा पिछाडीवर होता. पण त्यानंतर शानदार पुनरागमन करत त्याने 12-7 असा विजय मिळवला. बजरंगने याआधी 2017 मध्येही या स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. पण पुढच्याचवर्षी त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते.

बंजरंगने आज उझबेकिस्तानच्या सिरोजोद्दीन खासनोवला उपांत्य फेरीत 12-1 असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तसेच त्याआधी त्याने इराणच्या पेमॅन बायबानी आणि श्रीलंकेच्या चार्ल्स फर्न यांना पराभूत केले होते.

Loading...

त्याच्याबरोबरच आज 79 किलो वजनीगटात रौप्य पदक मिळवणाऱ्या प्रविण राणाला अंतिम सामन्यात इराणच्या बहमान मोहम्मद तैमुरी विरुद्ध पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे त्याला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले.

तसेच 97 किलो वजनी गटात भारताच्या सत्यव्रत कादियानला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

Loading...

या स्पर्धेत महिलांच्या गटात विनेश फोगट, साक्षी मलिक, पुजा धंडा आणि दिव्या काकरान सहभागी झाल्या आहेत. यांच्याकडूनही भारताला पदकांची आशा आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

समालोचकांच्या प्रश्नाने पृथ्वी शॉ पडला गोंधळात, सांगितले गांगुली, पाँटिंगमधील एकाला निवडण्यास, पहा व्हिडिओ

रिषभ पंतसाठी आयपीएलमधील हा आहे सर्वात खास क्षण, पहा व्हिडिओ

You might also like
Loading...