संयुक्त अमिराती येथे सुरू असलेल्या आशिया चषकाचा (Asia Cup) 15वा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. 11 सप्टेंबरला याचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. तर बुधवारी (7 सप्टेंबर) शारजाह येथे पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (PAKvsAFG)संघात सुपर फोरचा सामना झाला. हा सामना पाकिस्तानने 1 विकेट आणि 4 चेंडू शिल्लक राखत जिंकला. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघातील खेळाडूंनी अटीतटीचे प्रयत्न केले. यामध्ये पाकिस्तानचा आसिफ अली आणि अफगाणिस्तानचा फरीद अहमद यांच्यात शाब्दीक चकमक दिसली. त्यांच्या या वागणुकीमुळे आयसीसीने त्यांना शिक्षाही केली आहे.
झाले असे की, शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या या सामन्यात तणावपूर्वक स्थिती निर्माण झाली. पाकिस्तानने 18 षटकापर्यंत 7 विकेट्स गमावल्या होत्या. पाकिस्तानचा आसिफ अली (Asif Ali) हा फलंदाजी करत होता, तर गोलंदाजी करण्यासाठी फरीद अहमद (Fareed Ahmad) होता. त्याने टाकलेल्या स्लो बाउंसर चेंडूवर आसिफ बाद झाला. तो बाद झाल्यावर फरीदने त्याच्यासमोर जल्लोष केला होता. यावरून आसिफ चिडला आणि त्याने फरीदला धक्का दिला.
स्थिती इतकी गंभीर झाली की पंचांनाही मध्ये पडावे लागले. तर आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आसिफ आणि फरीद यांच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आयसीसी त्यांना दंड ठोठावला असून त्यांच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली आहे. आयसीसीचा नियम सांगतो की, काहीही झाले तरी मैदानावर कोणताही खेळाडू विरोधी संघावर हात उगारू शकत नाही. तर स्पर्धेतील आता पाकिस्तानचे दोन आणि आफगाणिस्तानचा एकच सामना खेळण्याचा बाकी आहे. यामुळे आसिफ आणि फरीद यांच्यावर स्पर्धेतूनच बाहेर पडण्याची वेळ आली आहे.
The actual video of shameful attitude by this unknown bowler of Afghanistan shoving gestures in the face of Asif Ali. Ungrateful gits! pic.twitter.com/OrFpiEipY3
— Wajahat Kazmi (@KazmiWajahat) September 7, 2022
हा सामना जिंकत पाकिस्तानने आशिया चषकाच्या अंतिम फेरीत जागा पक्की केली आहे. अंतिम सामना पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (PAKvsSL) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ASIA CUP: शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानचे हे खेळाडू भारतासाठी काळ ठरणार!
‘चाहरची संघात एन्ट्री- भुवीची हकालपट्टी!’ पाहा अफगाणिस्तान विरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग 11
मास्टर क्लास सुरू! रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजसाठी सचिनने केला सरावाचा श्रीगणेशा; पाहा व्हिडिओ