जगातील सर्वांत लोकप्रिय स्पर्धेपैकी एक म्हणजे कबड्डी. महिला कबड्डी लीग (WKL), या वर्षी दुबई, संयुक्त अरब अमिराती (UAE) शहरात आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ही भारतीय संघाकडून खेळली जाणारी पहिली महिला कबड्डी लीग आहे, जी 16 जून रोजी संध्याकाळी 6:00 वाजता एका भव्य उद्घाटन समारंभाने सुरू होईल. त्यानंतर 12 दिवस कबड्डीचे रोमांचक 31 सामने खेळले जाणार आहेत. दरम्यान, या लीगमध्ये भारतभरातील 120 महिला कबड्डीपटू आपले क्रीडा कौशल्य दाखवतील. उत्कृष्ट क्रीडा सुविधांसाठी जगभरात ओळखल्या जाणाऱ्या दुबईतील ‘शबाब अल-अहली’ स्पोर्ट्स क्लबमध्ये सर्व सामने खेळवले जाणार आहेत.
महिला कबड्डी लीग हे महिलांना खेळण्यासाठी प्रेरित करण्याच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचे आणि क्रांतिकारी पाऊल आहे. जगभरातील सर्व क्रीडा संघटना या कार्यक्रमासाठी उत्सुक आहेत. शिवाय, या लीगमध्ये महिला खेळाडूंना आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार आहे. महिला कबड्डी लीग (Women’s Kabaddi League) ही खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींसाठी जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देईल. पंजाब आणि तामिळनाडूमध्ये सुरू झालेला हा खेळ आता जगभरात म्हणजेच कॅनडा, पाकिस्तान, इराण आणि इतर अनेक देशांमध्ये खेळला जातो. महिला कबड्डी संघाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ कबड्डी लीग नाही तर महिला सक्षमीकरणासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ देखील उभारण्यात आले आहे. WKL च्या व्यवस्थापन संघामध्ये कबड्डी संबंधित अनेक प्रख्यात आणि नामांकित व्यक्तींचा सहभाग आहे. मोठ्या प्रमाणावर कबड्डी लीगचे आयोजन केले जात असून, सर्व सामने दुबईत (United Arab Emirates) खेळवले जातील.
खेड्यातील महिलांना खेळण्यासाठी प्राधान्य मिळणार
जागतिक प्रशिक्षक आणि सुवर्णपदक विजेते खेळाडू नवीन खेळाडूंचे मार्गदर्शन करतील. गरिमा चौधरी WKL च्या व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि सुरेंद्र कुमार ढाका आणि जयप्रकाश सिंग हे संचालक पदावर आहेत. तांत्रिक अधिकारी म्हणून आरडी कौशिक आणि महावीर सिंग, मुख्य प्रशिक्षक म्हणून होशियार सिंग आणि मुख्य पंच म्हणून मोहन सिंग भामू हेही या कार्यक्रमाशी संबंधित आहेत. तसेच भूपेंद्र सिंग, जयवीर सिंग, जगदीश प्रसाद गढवाल, अमित जाखर आणि रविता फौजदार हे प्रशिक्षक म्हणून काम करतील आणि खेळाडूंना प्रशिक्षण देतील. शारीरिक शिक्षणाच्या प्राध्यापिका सीमा तक्षक या प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करताना दिसतील. डॉ नीती माथूर आणि डॉ सोनाली कुशवाह या फिजिओच्या किरकोळ तपशिलांमध्ये मार्गदर्शन करतील. शिवाय, जगप्रसिद्ध आणि सुवर्णपदक विजेते खेळाडू प्रदीप नरवाल, संदीप नरवाल, मनिंदर सिंग आणि सुरेंद्र नाडा यांनीही WKL ला आपला पाठिंबा दर्शवला आहे. ज्यामुळे लीगच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ होत आहे. लहान शहरे आणि खेडेगावातील महिलांचे सक्षमीकरण करणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. WKL चे प्राथमिक उद्दिष्ट लहान शहरे आणि ग्रामीण भागातील महिला आणि मुलींच्या क्रीडा कौशल्याला वाव देणे हे आहे. (India’s first women’s Kabaddi League)
लाखोंच्या घरात गेली एका खेळाडूची किंमत
APS स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजमेंट हे मुख्य भागीदार आहे. तसेच APS स्पोर्ट्स मॅनेजमेंट WKL चे मुख्य भागीदार आहे. APS ही जागतिक दर्जाची कंपनी आहे. ही कंपनी क्रीडा व्यवस्थापन, नियोजन आणि क्रीडा इव्हेंट स्पर्धांच्या अंमलबजावणीची काळजी घेते. खेळाडू आणि व्यवस्थापनासाठी आश्चर्यकारक सुविधा आणि चाहत्यांसाठी एक रोमांचक अनुभव प्रदान करण्याचे कंपनीचे मुख्य ध्येय आहे. एका कबड्डीपटूचा 33 लाख रुपयांना लिलाव झाला आहे, यावरून आपण समजु शकतो की, भारतात कबड्डीची लोकप्रियता किती पोहोचली आहे.
दुबईत खेळवला जाणार सामना
8 संघ, 31 सामने WKL मध्ये खेळले जाणार आहेत. त्यामध्ये राजस्थान रायडर्स, दिल्ली डायनामाईट्स, गुजरात एंजल्स, ग्रेट मराठा, हरियाणा हसलर्स, पंजाब पँथर्स, उमा कोलकाता आणि बेंगळुरू हॉक्स या आठ संघांमध्ये 31 सामने खेळवले जातील. प्रत्येक संघाची स्वतःची अद्वितीय प्रतिभा, रणनीती आणि वैशिष्ट्य पहायला मिळणार आहे. हरविंदर कौर (ज्येष्ठ राष्ट्रीय कबड्डीपटू आणि सुवर्णपदक विजेता) आणि मोती चंदन (आशियाई क्रीडा स्पर्धेतील राष्ट्रीय कबड्डीपटू) यांसारख्या ज्येष्ठ खेळाडूंचाही या लीगच्या यशात हातभार लागेल. जागतिक दर्जेच्या सुविधांच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे. WKL चे आयोजन प्रसिद्ध शबाब अल-अहली स्पोर्ट्स क्लबमध्ये केले जाईल. जे जगभरातील अप्रतिम क्रीडा सुविधांसाठी ओळखले जाते तसेच जागतिक दर्जाची सुविधा आणि आधुनिक पायाभूत सुविधा चाहत्यांना विस्मरणीय अनुभव देईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
“कर्णधारासह सगळेच स्वार्थासाठी खेळले “, इंग्लंडच्या दिग्गजाचा आपल्याच सहकाऱ्यांवर गंभीर आरोप
WTC फायनलवर पावसाचे सावट! खेळ न झाल्यास असा ठरवला जाणार विजेता