टोकियो ऑलिम्पिक सुरू होण्यास काही दिवस शिल्लक आहेत. याचे उद्घाटन २३ जुलै रोजी होणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने ११९ खेळाडूसोबत एकूण २२८ जणांचे पथक पाठवले जाणार आहे. हे ऑलिम्पिकमधील हा भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक असेल. रिओ ऑलिम्पिकमध्ये ११८ भारतीय खेळाडूंनी भाग घेतला होता. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोरोनाच्या संकटामुळे प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही. टोकियो ऑलिम्पिकला आता केवळ आठवड्यांपेक्षाही कमी कालावधी राहिला असल्याने ऑलिम्पिकमधील इतिहासातील काही रंजक गोष्टींबद्दल जाणून घेऊ.
ऑलिम्पिकमध्ये नव्हता महिलांचा समावेश
ग्रीसची परंपरा असलेला ऑलिम्पिक खेळावर रोमन सम्राट थियोडोसियसने १५०० वर्षांपूर्वी बंदी घातल्यानंतर अथेन्समध्ये १८९६ साली पुन्हा स्पर्धा सुरु करण्यात आली होती. अथेन्स गेम्समध्ये केवळ पुरुष स्पर्धकांनी भाग घेतला. आधुनिक ऑलिम्पिकमधील ही एकमेव स्पर्धा होती ज्यात महिलांचा सहभाग नव्हता. त्यानंतर प्रत्येकवेळी महिला खेळाडूंचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होता
दिमित्रीओस लांड्रास ठरला सर्वात तरुण खेळाडू
६ ते १५ एप्रिल या कालावधीत १८९६ साली अथेन्स येथे झालेल्या या स्पर्धेत १४ देशांतील २४१ खेळाडूंनी भाग घेतला. ग्रीकचा जिम्नॅस्ट दिमित्रीओस लांड्रास सर्वात कमी वयाचा ऑलिम्पियन बनला. त्याने वयाच्या १० वर्ष आणि २१८ दिवसांचा असताना समांतर बार स्पर्धेत भाग घेतला होता आणि तिसरा क्रमांक मिळविला होता.
प्रथम क्रमांकाच्या खेळाडूला सुवर्णपदक मिळाले नव्हते
अथेन्स गेम्समध्ये १८९६ साली खेळाडूंनी ट्रॅक अँड फिल्ड, सायकलिंग, जलतरण, जिम्नॅस्टिक, वेटलिफ्टिंग, कुस्ती, तलवारबाजी, शूटिंग आणि टेनिस अशा एकूण ४३ स्पर्धांमध्ये सहभाग नोंदलवला होता. विजेत्यांना पदक देण्यात आले होते. यापैकी कोणालाही सुवर्णपदक दिले गेले नव्हते. प्रथम क्रमांकाच्या खेळाडूंना रौप्य पदक. दुसर्या क्रमांकावर आलेल्या खेळाडूंना कांस्य रजत पदक देण्यात आले होते. तर तिसर्या क्रमांकावर आलेल्या खेळाडूंना रिकाम्या हाताने परतावे लागले होते.
कार्ल शुमान सर्वात यशस्वी खेळाडू
पहिल्या ऑलिम्पिकमध्ये जर्मनीचा कार्ल शुमान हा सर्वात यशस्वी खेळाडू ठरला होता. जिम्नॅस्टिक्स आणि कुस्ती या चार स्पर्धांमध्ये तो अव्वल आला होता. पनाथेनाईक स्टेडियमवर झालेल्या कुस्ती स्पर्धेसाठी कोणतेही वजन गट नव्हते. यामुळे सर्व सहभागींपैकी फक्त एकच विजेता होता. ग्रीको-रोमन कुस्तीचे नियम अस्तित्वात होते, परंतु वेळेची मर्यादा नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या –
अबब! १०० कोटींच्या क्लबमध्ये ‘या’ ५ धुरंधरांचा समावेश; जाणून घ्या कुणाची आहे किती कमाई?