सेन्चुरियन। दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात २ बाद १८२ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्करमने अर्धशतक झळकावले आहे.
दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या दोन्ही सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली होती. मार्करम आणि डीन एल्गार यांनी ८५ धावांची सलामी भागीदारी केली. या दोघांनीही सामन्याच्या पहिल्या सत्रात भारताच्या एकाही गोलंदाजाला बळी घेण्यात यश मिळू दिले नव्हते.
दुसऱ्या सत्रात मात्र आर अश्विनने प्रथम एल्गारला ३१ धावांवर आणि नंतर मार्करमला १५० चेंडूत ९४ धावांवर असताना बाद करून भारताला यश मिळवून दिले. मार्करमचे शतक फक्त ६ धावांनी हुकले आहे.
सध्या एबी डिव्हिलियर्स १६ धावांवर आणि हाशिम अमला ३५ धावांवर नाबाद खेळत आहेत.