टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शनिवारी (३१ जुलै) पुरुष तिरंदाजीत भारताला अपयश आले. पुरुष तिरंदाजीतील एकेरी गटात उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना भारताच्या अतनू दास आणि लंडन ऑलिंपिक पदक विजेत्या जपानच्या ताकाहारू फुरुकावामध्ये झाला. हा सामना ताकाहारूने ६-४ ने आपल्या नावावर केला. यामुळे तिरंदाजीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. यानंतर अतनूने एक भावुक पोस्ट शेअर करत देशाची माफी मागितली आहे. त्याच्या या पोस्टवर ऑलिंपिक्सनेही कमेंट केली आहे.
अतनूने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत लिहिले की, “माफ करा. मी या ऑलिंपिकमध्ये यश मिळवू शकलो नाही. मात्र, भारतीय क्रीडा प्राधिकरण, भारतीय तिरंदाजी आणि ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टकडून आतापर्यंत मिळालेला पाठिंबा विलक्षण आहे. आपण नेहमीच पुढे जात राहिले पाहिजे. आणखी सांगण्यासाठी काही नाही. जय हिंद.” (Atanu Das Feel Sorry After Defeat Against Japan’s Takaharu Furukawa)
https://twitter.com/ArcherAtanu/status/1421357251726516227
अतनूच्या या पोस्टला १० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच १ हजारांपेक्षाही अधिक रिट्विट्स आणि ७०० पेक्षाही अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. त्याच्या या पोस्टवर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. ऑलिंपिक्सने कमेंट करून म्हटले आहे की, “तू चांगला खेळलास!”
You were great! #StrongerTogether
— The Olympic Games (@Olympics) July 31, 2021
या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये जपानच्या ताकाहारूने २७- २५ ने आपल्या नावावर केला होता. मात्र, पुढच्या म्हणजेच दुसऱ्या सेटमध्ये अतनूने त्याला चांगलेच आव्हान देत २८-२८ अशी बरोबरी साधली होती. तिसऱ्या सेटमध्ये मात्र अतनू दास चमकला होता. त्याने २८-२७ ने तिसरा सेट आपल्या नावावर केला होता. यानंतर चौथ्या सेटमध्ये पुन्हा २८-२८ ची बरोबरी पाहायला मिळाली. मात्र, पाचवा सेट अतनूच्या नशिबात नव्हता. त्याला ताकाहारूने पाचव्या सेटमध्ये २७-२६ने धूळ चारली होती.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-दोन वेळची पदक विजेती सीमा पुनियाने केला ६०.५७ मीटरचा डिस्कस थ्रो; मिळवला ‘हा’ क्रमांक
-लंडन ऑलिंपिक मेडलिस्टकडून अतनू दास पराभूत; तिरंदाजीतील भारताचे आव्हान संपुष्टात