टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शनिवारी (३१ जुलै) पुरुष तिरंदाजीत भारताला अपयश आले. पुरुष तिरंदाजीतील एकेरी गटात उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना भारताच्या अतनू दास आणि लंडन ऑलिंपिक पदक विजेत्या जपानच्या ताकाहारू फुरुकावामध्ये झाला. हा सामना ताकाहारूने ६-४ ने आपल्या नावावर केला. यामुळे तिरंदाजीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये जपानच्या ताकाहारूने २७- २५ ने आपल्या नावावर केला. मात्र, पुढच्या म्हणजेच दुसऱ्या सेटमध्ये अतनूने त्याला चांगलेच आव्हान देत २८-२८ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये मात्र अतनू दास चमकला. त्याने २८-२७ ने तिसरा सेट आपल्या नावावर केला. (Atanu Das goes down fighting to London Olympic medalist Takaharu Furukawa 4-6 in Pre-QF)
#TeamIndia | #Tokyo2020 | #Archery
Men's Individual 1/8 Eliminations ResultsAtanu Das goes down against #London2012 Silver medallist Takaharu Furukawa. Spirited effort @ArcherAtanu 👏🙌 We'll be back #StrongerTogether #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/KI8De8CTIl
— Team India (@WeAreTeamIndia) July 31, 2021
यानंतर चौथ्या सेटमध्ये पुन्हा २८-२८ ची बरोबरी पाहायला मिळाली. मात्र, पाचवा सेट अतनूच्या नशिबात नव्हता. त्याला ताकाहारूने पाचव्या सेटमध्ये २७-२६ने धूळ चारली.
#JPN's Takaharu Furukawa gets the better of Atanu Das and it's over for #IND in #archery 💔
Atanu loses 6-4 to Furukawa after a close battle of bows 🏹#Tokyo2020 | #UnitedByEmotion | #StrongerTogether
— Olympic Khel (@OlympicKhel) July 31, 2021
महिला तिरंदाजीतही भारताला अपयश
महिला तिरंदाजीत भारताकडून दीपिका कुमारी उतरली होती. तिच्याकडून भारताला खूप अपेक्षा होत्या. ती पदक जिंकले अशी आशा सर्वांना होती. मात्र, ती अपयशी ठरली. शुक्रवारी (३० जुलै) महिला तिरंदाजीतील उपांत्यपूर्व फेरीच्या एकेरी गटातील सामन्यात दक्षिण कोरियाच्या ऍन सॅनने दीपिकाला ६-० ने अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. यासह दीपिकाचा टोकियो ऑलिंपिक्स २०२० मधील प्रवास इथेच संपला.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना