गुरुवारी (२९ जुलै) टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये पुरुष तिरंदाजीत भारताला यश मिळताना दिसत आहे. पुरुष तिरंदाजीतील एकेरी गटात राऊंड १६ मधील सामना भारत आणि दक्षिण कोरिया संघात पार पडला. या सामन्यात भारताच्या अतनू दासने माजी ऑलिंपिक विजेत्या दक्षिण कोरियाच्या ओ जिन-हायकला ६-५ ने पराभवाचं पाणी पाजलं आहे. तसेच त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे तो पदकाच्या खूपच जवळ पोहोचला आहे.
हा सामना खूपच रंजक होता. अतनू आणि हायक या दोन्ही खेळाडूंमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. तब्बल ३ सेट बरोबरीत सुटले. पहिल्या सेटमध्ये अतनूला २५-२६ ने पराभव स्विकारावा लागला. मात्र, पुढच्या दोन सेटमध्ये बरोबरी झाली. त्यानंतर चौथा सेट अतनूने २७-२२ ने जिंकला. मात्र, पाचव्या सेटमध्ये अतनू आणि हायकमध्ये पुन्हा २८- २८ अशी बरोबरी झाली. (Atanu Das stuns former Olympic & World Champion Oh Jinhyek of South Korea 6-4 in 2nd round )
#TeamIndia | #Tokyo2020 | #Archery
Men's Individual 1/16 Eliminations ResultsUnbelievable shoot-off by archer @ArcherAtanu to hit a 10🎯 to advance. Stuns former Olympic & World Champion Oh Jinhyek of South Korea. Bravoo champ!! #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/p6lp2Jcf9S
— Team India (@WeAreTeamIndia) July 29, 2021
त्यानंतर शूटऑफमध्ये हायकने ९ गुण मिळवले, तर अतनूने १० गुण मिळवत हा पुरुषांचा वैयक्तिक राऊंड आपल्या आपल्या खिशात घातला.
यापूर्वी झालेल्या राऊंड ३२ च्या सामन्यात भारताच्या अतनू दासने चीनच्या डेंग यू- चेंगला ६-४ ने पराभूत केले होते. पहिल्या सेटमध्ये भारताच्या अतनू दासने २७ गुण मिळवले होते, तर चेंगने २६ गुण मिळवले होते. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये अतनूने २७ गुण मिळवले, तर चेंगने २८ गुण मिळवत हा सेट आपल्या नावावर केला होता. तिसऱ्या सेटमध्ये अतनूने पुनरागमन करत २८-२६ ने सेट जिंकला होता. पुढे चौथा सेट चेंगने २८- २७ ने जिंकला होता. त्यानंतर अतनूने २८-२६ ने पाचवा सेट जिंकला होता.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-नौकानयनात भारतीय जोडीचे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन; पटकावला ‘हा’ क्रमांक
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना