---Advertisement---

स्टेडियममध्ये MPL 2025 पाहायला जाणारे प्रेक्षक होऊ शकतात लखपती, MCA ची भन्नाट कल्पना

On: सोमवार, मे 26, 2025 6:47 PM
---Advertisement---

MPL 2025: महाराष्ट्र क्रिकेट संघटना आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2025) व वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (WMPL 2025) दोन्ही स्पर्धा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होत आहेत. या स्पर्धेसाठी एमसीएने कंबर कसली असून, चाहत्यांना स्टेडियमपर्यंत आणण्यासाठी अनेक नवीन उपक्रम सुरू केले जात आहेत. या दोन्ही स्पर्धा पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येणाऱ्या चाहत्यांना लखपती होण्याची संधी एमसीएतर्फे उपलब्ध करून दिली गेली आहे.

एमपीएलचा सलग तिसरा व डब्ल्यूएमपीएलचा ‌पहिला हंगाम गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. 5 जून रोजी डब्ल्यूएमपीएलची तर 4 जूनपासून एमपीएलची सुरुवात होणार आहे. एमपीएलचा अंतिम सामना 22 जून रोजी खेळला जाईल. यादरम्यान ‌स्टेडियममध्ये सामना पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना एका हातात झेल पकडून लाख रुपये मिळू शकतात.

एटेनक्स (ATENX) या प्रमोशनल कंपनीने प्रेक्षकांमध्ये मारलेला षटकार एका हातात झेलणाऱ्या चाहत्यांना 25,000 पासून एक लाखांपर्यंत रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. चाहत्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असेल. मात्र, त्यासाठी मैदानात सामना पाहायला जाणाऱ्या चाहत्यांना त्यांच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल.

यासोबतच प्रत्येक ‌सामन्यानंतर होणाऱ्या स्पर्धेत झेल टिपणाऱ्या प्रेक्षकाला दोन हजार रुपये बक्षीस पारितोषिक वितरण सोहळ्या दरम्यान दिले जाईल.‌ यासोबतच एमपीएल अंतिम सामन्यात एका हाताने झेल पकडणाऱ्या दोन प्रेक्षकांना प्रत्येकी 50 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. जगभरातील अनेक लीगमध्ये अशा प्रकारच्या इव्हेंटचे आयोजन होत असते. एमपीएल व डब्ल्यूएमपीएलमध्ये मिळून तब्बल 12 लाख रुपये चाहते जिंकू शकतात. एमसीए अध्यक्ष आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या अनोख्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन केले आहे.

MPL व‌ WMPL या दोन्ही स्पर्धां JioHotstar या ओटीपी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहेत. तर, स्टार स्पोर्टच्या Star Sports 2 या टीव्ही चॅनेलवर घरी बसून सामन्यांची मेजवानी घेऊ शकतो. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---