पुणे| पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या मान्यतेखाली पुणे जिल्हा राज्य निवड अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत पुरुष गटात पॅराटेनिसपटू अथर्व अगरवाल, अविनाश पवार, श्रेयस लंके, प्रथमेश शिंदे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी टेनिस कोर्टवर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पुरुष गटात पहिल्या फेरीत अथर्व अगरवालने प्रशांत लिखितेचा 6-0 असा एकतर्फी पराभव केला. 17 वर्षीय अथर्व हा फर्ग्युसन कॉलेज येथे प्रशिक्षक नंदन बाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. वयाच्या सातव्या वर्षी अर्थव मनालीला गेला होता व त्यावेळी त्याच्या हाताला ट्रान्सफॉर्मरचा झटका बसल्याने उजव्या हाताला दुखापत झाली. असे असताना देखील पहिल्यापासूनच खेळाची आवड असलेल्या अथर्वने आपल्या दिव्यांगपणावर मात करत गेली दीड वर्षे टेनिसचा दररोज दोन तास सराव करून विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे. याआधी त्याने पुणे व अहमदाबाद येथील स्पर्धेत सहभागी होऊन दुसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली होती.
चुरशीच्या लढतीत अविनाश पवारने नरेश अरोराचा टायब्रेकमध्ये 6-5(7-3) असा पराभव करून आगेकूच केली. ऋषिकेश घारपुरेने श्री राऊतचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून दुसरी फेरी गाठली. अन्य लढतीत श्रेयस लंकेने ओम राऊतला 6-2 असे पराभूत केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: पुरुष गट:
अथर्व अगरवाल वि.वि.प्रशांत लिखिते 6-0;
जॉली तेजेश्वर वि.वि.संतोष चिटणीस 6-3;
अविनाश पवार वि.वि.नरेश अरोरा6-5(7-3);
नुपूर चौधरी वि.वि.अतुल सरदेसाई 6-3;
ऋषिकेश घारपुरे वि.वि.श्री राऊत 6-4;
श्रेयस लंके वि.वि.ओम राऊत 6-2;
प्रथमेश शिंदे वि.वि.अनिरुद्ध जाधव 6-1;
सुमंत महाबळेश्वर वि.वि.आदित्य सोंडकर 6-3.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० क्रिकेट असो वा विश्वचषक, दक्षिण आफ्रिकाच पडलीय श्रीलंकेवर भारी; यंदा पलटणार का बाजी?
पाकिस्तानच्या विजयाच्या हॅट्रिकने बदललं गुणतालिकेचं समीकरण, ‘हा’ संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर