इंडियन सुपर लीग 2022-2023 हंगाम शनिवारी (18 मार्च) समाप्त झाला. गोवा येथे झालेला अंतिम सामना बेंगलोर एफसी व एटीके मोहन बागान यांच्या दरम्यान पार पडला. पेनल्टी शूटआउट पर्यंत ताणल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात एटीके मोहन बागानने 4-3 असा विजय मिळवत पहिल्यांदाच आयएसएल विजेतेपद पटकावले.
.@atkmohunbaganfc are the CHAMPIONS of #HeroISL 2022-23! 🏆
Congratulations, #Mariners! 👏#ATKMBBFC #HeroISLFinal #LetsFootball #ATKMohunBagan pic.twitter.com/eNHYNrd7gi
— Indian Super League (@IndSuperLeague) March 18, 2023
गोवा येथील मैदानावर या अंतिम सामन्यात उतरताना बेंगलोर संघ आपले दुसरे आयएसएल विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने उतरला होता. तर, एटीके मोहन बागान नामकरण झाल्यानंतर तीन वर्षात एकही विजेतेपद न पटकावलेल्या संघाला आपल्या पहिल्या विजेतेपदाची प्रतीक्षा होती. सामन्याच्या चौदाव्या मिनिटाला रॉय कृष्णा याने केलेल्या हँडबॉलमुळे एटीकेला पेनल्टीवर गोल करण्याची संधी मिळाली. ही संधी पेट्रोटासने साधली. पहिल्या हाफच्या इंजुरी टाईममध्ये सुनील छेत्रीने पेनल्टी सत्कारणी लावत बंगलोरला बरोबरीत आणले.
दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक खेळ दाखवत गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, कोणत्याच संघाला यश मिळत नव्हते. अखेरीस रॉय कृष्णा याने 78 व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल करत बेंगलोर संघाला आघाडीवर नेले. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. 85 व्या मिनिटाला पेट्रोटास याने मिळालेल्या पेनल्टीवर गोल करत सामना बरोबरीत आणला. त्यानंतर पूर्ण वेळेत आणखीन गोल होऊ शकला नाही.
अतिरिक्त वेळेच्या दोन हाफमध्ये देखील दोन्ही संघ गोल करण्यात अयशस्वी ठरले. त्यानंतर पेनल्टी शूट आउटमध्ये बेंगलोरकडून रामीरेझ व पेरेझ गोल करण्यात अपयशी ठरल्याने एटीके मोहन बागानचा विजय सोपा झाला.
(ATK Mohun Bagan Clinch ISL 2022-2023 Trophy After Beating Bengaluru FC In Penalty Shootout)