Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘टॉप फोर’मध्ये स्थान मिळवण्यास मोहन बागान उत्सुक

January 14, 2022
in टॉप बातम्या, फुटबॉल
atkmb

Photo Courtesy: Twitter/ATKMB


गोवा (१४ जानेवारी) : हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) ‘सॅटर्डे स्पेशल’सामन्यात (१५ जानेवारी) एटीके मोहन बागान एफसी हा परंपरागत प्रतिस्पर्धी बंगलोर एफसीवर विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल चार संघांत स्थान मिळवण्यास उत्सुक आहे.

फातोर्डा येथील पीजीएन स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत ९ सामन्यांतून १५ गुणांसह पाचव्या स्थानी असलेल्या मोहन बागानचे पारडे जड आहे. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी असलेल्या अनुक्रमे हैदराबाद एफसी आणि मुंबई सिटी एफसी तसेच मोहन बागानमध्ये केवळ दोन गुणांचा फरक आहे. आणखी एका विजयासह केवळ ‘टॉप फोर’मध्ये नव्हे तर अव्वल स्थानी असलेल्या केरळा ब्लास्टर्सच्या (११ सामन्यांतून २० गुण) जवळ पोहोचू शकतील.
हुआन फेरँडोच्या प्रशिक्षकपदाखालील मोहन बागानला आश्वासक सुरुवातीनंतर सातत्य राखता आले नाही. मात्र, सलग दोन पराभवांनंतर त्यांनी मागील पाच सामन्यांत हार खाल्लेली नाही. त्यात तीन बरोबरी आणि दोन सलग विजय आहेत. तीन ड्रॉमध्ये शेवटच्या सामन्याचा (वि. हैदराबाद एफसी) समावेश आहे.
फॉरवर्ड ह्युगो बॉमॉस हा बागानच्या अपराजित वाटचालीतील महत्त्वाचा घटक आहे. त्याने नऊ सामन्यांत ५ गोल केलेत. शिवाय ३ गोल करण्यात (असिस्ट) मदत केली आहे. एटीकेकडूनआठव्या हंगामात गोल करण्यासह असिस्ट करण्यात तो आघाडीवर आहे. मात्र, चौथ्यांदा पिवळे (यलो) कार्ड दाखवले गेल्याने बॉमॉस हा बंगलोरविरुद्धच्या सामन्याला मुकला आहे.
पहिल्या टप्प्यातील खराब कामगिरीतून बोध घेण्यात बंगलोर एफसीला यश आले आहे. मागील पाच सामन्यांत त्यांनी पराभव पाहिलेला नाही. शिवाय दोन सामने जिंकलेत. चेन्नईयन एफसीसह गतविजेता मुंबई सिटी एफसीवर त्यांनी मात केली आहे. मुंबई सिटीवरील ३-० अशा मोठ्या विजयानंतर बंगलोरचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला आहे. गेल्या काही सामन्यांत क्लीटन सिल्वा पाठोपाठ प्रिन्स इबारा याला सूर गवसल्याने प्रशिक्षक मार्को पेझाइउओली यांचे काम हलके झाले आहे. काँगोचा स्ट्रायकर इबाराने यंदाच्या हंगामात चार गोल मारताना तीन गोल करण्यास मदत केली आहे.
एटीके मोहन बागान आणि बंगलोर एफसी आजवर सहा वेळा आमनेसामने आहेत. त्यात ३-३ अशी बरोबरी आहे. ११ सामन्यांतून १३ गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी असलेल्या बंगलोरने सातत्य राखताना वरच्या स्थानावर असलेल्या एटीके मोहन बागानला हरवल्यास थेट पाचव्या स्थानी ते झेप घेऊ शकतात.


Next Post
Sachin-Tendulkar-MakarSakranti-Wishes

इथे तिथे नव्हे तर गोल्फच्या मैदानावर सचिन तेंडूलकर साजरी करतोय मकरसंक्रांत, बघा व्हिडिओ

capetown rishabh 100

सर्वकालीन महान सलामीवीराने रिषभला दिली 'स्टँडिंग ओव्हेशन'; शतकी खेळीबाबत म्हणाला...

marnus Labuschagne

याला म्हणतात धूळ चारणे! लॅब्युशेन झाला हास्यास्पद पद्धतीने बाद; तुम्हीही पाहा विनोदी व्हिडिओ

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143