येत्या १ जानेवारी पासून फुटबाॅल ट्रांस्फरची विंडो उघडणार आहे. जरी उन्हाळ्यातली ट्रांस्फर विंडोही खेळाडूंच्या ट्रांस्फरसाठी प्रसिद्ध असली तरी या हिवाळी विंडोमध्ये काही मोठ्या खेळाडूंच्या ट्रांस्फरची चर्चा जोरात आहे आणि त्यात बार्सिलोना संघ अग्रस्थानी आहे.
त्यांचे मागील विंडोचे टार्गेट लिवरपूलचा काॅटिन्हो सोबतच ॲटलेटिको डी मॅड्रिडचा स्टार अँटोनियो ग्रिझमान पण बार्सिलोनाकडे जाण्याच्या तयारीत आहे.
ट्रांस्फर विंडो चालू होण्याच्या आधीच ग्रिझमानशी बोलणी चालू केली असा आरोप करत काल ॲटलेटिको डी मॅड्रिडने फीफाकडे तक्रार दाखल केली.
जर हा आरोप सिद्ध झाला तर बार्सिलोनावर २ ट्रांस्फर विंडोची बंदी येईल. या तक्रारीवर उत्तर देत ग्रिझमान बरोबर कोणतीही ट्रांस्फरची चर्चा झाली नाही असे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे आता परत एकदा सगळे ॲटलेटिको डी मॅड्रिडवर अवलंबून आहे. त्यांना बार्सिलोना आणि ग्रिझमान मध्ये चर्चा झाली हे सिद्ध करावे लागणार आहे जे जवळजवळ अशक्य आहे.
बार्सिलोनाला त्यांचा डिफेंडर उमतितिच्या दुखापती आणि माशरानोच्या क्लब सोडयच्या इच्छे मुळे एका डिफेंडरची खुप आवश्यकता आहे.
डेम्बेलेच्या दुखापतीमुळे नेमारची जागा अजून कोणी १ खेळाडू भरु शकला नाही. त्यामुळे ट्रांस्फर वरील बंदी त्यांना खुप महागात पडु शकते.
लिवरपुलचा काॅटिन्हो आणि नाईसचा सेरी हे मिडफिल्डर तर ॲटलेटोकोचा स्टाईकर ग्रिझमान आणि कोलंबोचा डिफेंडर येरी मिना हे बार्सिलोनाचे या ट्रांस्फर विंडोचे प्रमुख टार्गेट समजले जाताय.
ला लीगाच्या गुणतालीकेत सध्या बार्सिलोना पहिल्या तर ॲटलेटिको डी मॅड्रिड दूसर्या स्थानावर आहे. दोन्ही संघात ६ गुणांचा फरक आहे.
दोन्ही संघात या मौसमात झालेला एकमेव सामना ०-० असा बरोबरीत सुटला होता. त्यामुळे आता हा मैदानाबाहेरील सामना कोण जिंकेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.