भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेतला दुसरा सामना शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) रात्री खेळला जाणार आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतलेली आहे. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारताचा विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल. तत्पूर्वी दुसऱ्या सामन्यासाठी वातावरन साफ असेल अशी माहिती समोर आली आहे. सामन्यादरम्यान आभाळात खूप कमी प्रमाणात ढग असतील आणि रात्री तापमानाता काही खास बदल होणार नाही. तसेच धुके आणि थंडीचे प्रमाणेही कमी असेल.
भारतीय हवामान विज्ञान केंद्राचे रांची प्रमुख अभिषेक आनंद यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, दक्षिण बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळे आकाश अंशतः ढगाळ राहील, पण त्याचा काहीच परिणाम होणार नाही.
त्यांनी सांगितले की, गुरुवारी रांचीचे वातावरण कोरडे राहीले आहे. अशीच स्थिती शुक्रवारी देखील कायम असेल. २१ नोव्हेंबरपासून राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. १९ नोव्हेंबरला रांचीचे कमाल तापमान २७ आणि कमीत कमी १५ डिग्री असेल. २० नोव्हेंबरला कमाल २६ आणि किमान १७ डिग्री, २१ नोव्हेंबरला कमाल २६ तर किमान १७ डिग्री असेल. तसेच २२ नोव्हेंबरला कमाल २७ तर किमान १८ डिग्री असेल, अशी शक्यता आहे.
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, केएल राहुल, रिषभ पंत, ईशान किशन, युजवेंद्र चहल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड संघ – मार्टिन गप्टिल, मार्क चॅपमन, जेम्स निशम, टॉड एश्ले, डेरिल मिचेल, मिचेल सॅटरनर, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्यूसन, ईश सोढी, टिम साउदी (कर्णधार), एडम मिल्ने.