पुणे| डेक्कन जिमखाना टेनिस विभागातर्फे आयोजित अतुल रुणवाल मेमोरियल डेक्कन जिमखाना टेनिस सोशल स्पर्धेत खुल्या दुहेरी गटात अथर्व अय्यर व क्षितिज कोतवाल, अर्जुन करमरकर व अभय घोगरे, परेश पुंगलिया व चिराग रुणवाल यांनी आपली विजयी मालिका कायम ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत राउंड रॉबिन फेरीत क गटात अथर्व अय्यरने क्षितिज कोतवालच्या साथीत मानसी गोडबोले व अमित मेहेंदळे 6-1 यांचा सहज पराभव करून तिसऱ्या विजयासह उपांत्य फेरी गाठली. अ गटात गट परेश पुंगलिया व चिराग रुणवाल यांनी साकेत गोडबोले व राहुल मेंगळे या जोडीचा 6-0 असा तर, दुसऱ्या सामन्यात परेश पुंगलिया व चिराग रुणवाल यांनी हिमांशू चौधरी व अभिजित गायकवाड यांचा 6-0 अशा सारख्याच फरकाने पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. क गटात अखेरच्या लढतीत मानसी गोडबोले व अमित मेहेंदळे यांनी अभिषेक रानडे व आतिश केकरे या जोडीवर 6-4 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: खुला दुहेरी गट: राउंड रॉबिन फेरी:
गट अ: परेश पुंगलिया/चिराग रुणवाल वि.वि.साकेत गोडबोले/राहुल मेंगळे 6-0;
गट अ: परेश पुंगलिया/चिराग रुणवाल वि.वि.हिमांशू चौधरी/अभिजित गायकवाड 6-0;
गट क: मानसी गोडबोले/अमित मेहेंदळे वि.वि.अभिषेक रानडे/आतिश केकरे 6-4;
गट क: अथर्व अय्यर/क्षितिज कोतवाल वि.वि.मानसी गोडबोले/अमित मेहेंदळे 6-1;
महत्त्वाच्या बातम्या-
सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी ‘विराटसेने’ला रचावा लागणार इतिहास, करावी लागणार आजवर न जमलेली कामगिरी
‘तुम्ही इथून निघून जा’, लाईव्ह शोमध्ये चॅनल होस्टकडून शोएब अख्तरचा घनघोर अपमान; पाहा व्हिडिओ
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का; ‘हा’ मॅचविनर झाला दुखापतग्रस्त