विराट कोहली हा भारतातच नाही तर क्रिकेट खेळणाऱ्या अनेक देशात लोकप्रिय खेळाडू आहे. त्यामुळे तो मैदानावरील त्याच्या कामगिरीबरोबरच त्याच्या मैदानाबाहेरील अन्य गोष्टींमुळेही चर्चेत असतो. तो अनेक मोठ्या कंपन्यांचा ब्रँड अँम्बेसिडर आहे. विराटला अधिकतर पैसे जाहिरातींमधून मिळतात. नुकतेच असे समोर आले आहे की ऑडी या कंपनीने त्याच्याबरोबरील करार वाढवला आहे.
जर्मन लक्झरी कारमेकर ऑडी यांनी शुक्रवारी सांगितले की भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या बरोबरचा ब्रँड अँम्बेसिडर म्हणून करार वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की विराट कोहली 2015 पासून ऑडीशी संबंधित आहे. वर्षानुवर्षे तो कंपनीच्या सामाजिक व अनेक मोहिमेचा तो अविभाज्य भाग आहे. #टुगेदरविदऑडी आणि #मूविंगफास्टफॉरवर्ड सारख्या अनेक मोहिमेशी विराट कोहली संबंधित आहे. विराट तो 2012 पासून ऑडी कार वापरत आहे.
ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीरसिंग ढिल्लन म्हणाले, “ऑडी इंडियासोबत बऱ्याच वर्षांपासून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली संबंधित आहे. विराट कोहलीशी असलेला आमचा करार कायम ठेवण्यात आम्हाला अत्यंत आनंद आहे. तो ब्रांड ऑडीच्या प्रीमियम इमेजशी पूर्णपणे जुळतो.
ते म्हणाले की, “विराट गेली पाच वर्षे ऑडीशी संबंधित आहे. ऑडी या ब्रँडच्या कामगिरीतील भव्य नाविन्यपूर्ण उदाहरणावर तो उत्तम प्रकारे फिट बसतो.” त्याच वेळी विराट म्हणाला, “ऑडी इंडियाशी असलेला माझा संबंध वाढविण्यात आणि ब्रँडचा एक भाग म्हणून करार सुरू ठेवण्यात मला खूप आनंद आहे. हे म्हणणे योग्य होईल की माझे ऑडीशी असलेले नाते हे टी20 क्रिकेट पेक्षा कसोटी क्रिकेटसारखेच आहे.”
ऑडीकडून विराटला मिळतात इतके रुपये
सूत्रांच्या माहिती नुसार विराट कोहली ऑडीकडून 6-7 कोटी रुपये फी म्हणून घेतो . कंपनी त्याला भारतात लाँच होणारे पहिले वाहन ऑफर करते. विराटची ही फी कंपनीच्या एका दिवसाच्या शूटिंग-फोटो शूटसाठी असते. म्हणजे जर दुसर्या दिवशी शूटिंग करायचं असेल तर तो तितकेच जास्त पैसे घेतो. या व्यतिरिक्त तो कंपनीच्या वाहन लॉन्चिंग कार्यक्रमातही भाग घेत असतो.
महत्वाच्या बातम्या
Video: पाकिस्तानी गोलंदाजाचा सामना करताना आंद्रे रसल जखमी; स्ट्रेचरवरुन न्यावे लागले हॉस्पिटलमध्ये
WIvSA: क्विंटन डी कॉकचे वादळी शतक, दक्षिण आफ्रिका दुसर्या दिवसाखेर मजबूत स्थितीत
अरे बापरे! श्रीलंका दौऱ्याआधी भारतीय संघ राहणार तब्बल इतके दिवस क्वारंटाईन