---Advertisement---

प्रेमच म्हणावे! सामना सोडा खेळाडूंना सराव करताना पाहण्यासाठी चाहत्यांची तुंबळ गर्दी, पाहा VIDEO

Rishabh-Pant-Cuttak
---Advertisement---

क्रिकेटमध्ये अनेकदा संघाच्या सरावादरम्यान मैदानात प्रेक्षकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. बहुतांश वेळा हे दृष्य आयपीएलच्या सामन्यांपूर्वी दिसून येते. ज्यावेळी अनेक देशांच्या खेळाडूंना एकत्र सराव करण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध असते. त्यातही भारतात क्रिकेटचे महत्तव सर्वज्ञात आहे. त्यामुळे जर आपल्या परिसरातील मैदानात भारतीय संघ अनेक वर्षांनंतर सामना खेळणार असेल तर त्या सामन्याची पूर्वतयारी मोफत बघायला मिळणार असेल, तर क्वचितच एखादा क्रिकेट चाहता ही संधी सोडून देईल. असेच काहीसं घडलं ओडीशायेथील कटक क्रिकेट स्टेडियम येथे.

तब्बल तीन वर्षांनंतर कटक येथील बाराबती स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. अशा परिस्थितीत रविरार (१२जून) रोजी होणाऱ्या सामन्याच्या सर्व तिकिटांची विक्री रास्त होती, मात्र आश्चर्याची बाब म्हणजे टीम इंडियाचे सराव पाहण्यासाठी स्टेडियम खचाखच भरले होते.

वास्तविक, शनिवारी टीम इंडियाने दुसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यापूर्वी स्टेडियममध्ये जोरदार सराव केला. यादरम्यान क्रिकेटप्रेमी स्टेडियममध्ये येत राहिले आणि बघता बघता स्टेडियम चाहत्यांनी भरून गेले. त्याचवेळी या चाहत्यांना भारतीय खेळाडूंनी निराश केले नाही. हार्दिक पांड्या असो किंवा कर्णधार रिषभ पंत असो, प्रत्येकाने क्रिकेट चाहत्यांना त्यांचे मोठे फटके दाखवले आणि रविवारी ब्लॉकबस्टर सामना पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त केली. बीसीसीआयने या सरावाचा व्हिडिओ सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

बीसीसीआयने हा व्हिडिओ आणि सरावादरम्यानचे काही फोटो शेअर करत लिहिले आहे की, “मॅच डे नसला तरी तो मॅच डेसारखाच वाटतो.” टीम इंडियाच्या सराव सत्रातही स्टेडियम खचाखच भरले होते. त्यामुळे आता रविवारी होणाऱ्या सामन्याला देखील अशीच गर्दी उपस्थित राहिल अशी आशा व्यक्त केली जात आहे. शिवाय सामन्याच्या टिकिट विक्रीवेळीही अशीच काहिशी गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले होते. त्यामुळे तीन वर्षांनंतर कटक मध्ये होणाऱ्या सामन्याला स्थानिक प्रिक्षक जोरदार हजेरी लावणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.

दरम्यान, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर २११ धावा करूनही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे भारतीय संघ नक्कीच थोडा दडपणाखाली असेल. अशा परिस्थितीत टीम इंडियाने पुनरागमन करावे आणि त्यांना एक चांगला सामना पाहायला मिळावा, अशी येथील क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

स्लेजिंगचे बादशाह समजले जाणारे पाकिस्तानी दिग्गज, खरं तर क्रिकेटचे आर्य चाणक्य होते!

आशिष नेहराने जेव्हा संघ सहकाऱ्याला दिला होता आपला ‘सामनावीर’ पुरस्कार, वाचा असे प्रसंग

आशियाई चषकाच्या क्वालिफायरमध्ये भारताची अफगाणिस्तानवर मात; छेत्री, समदचे महत्त्वपूर्ण गोल्स

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---