-अनिल भोईर
क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड व अनिषा ग्लोबल इंग्लिश स्कुल, आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय १९ वर्ष मुले/मुली कबड्डी स्पर्धा २०१८-१९ बीड येथे पार पडली. यास्पर्धेत औरंगाबाद विभागाच्या दोन्ही संघांनी विजेतेपद पटाकवले.
मुलाच्या विभागात झालेल्या उपांत्य सामन्यात कोल्हापूर ने मुंबई विभागाचा ५०-२३ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात औरंगाबाद विभागाने नागपूर विभागाचा ३७-२६ पराभव करत अंतिम फेरी गाठली.
मुलीच्या विभागात झालेल्या उपांत्य सामन्यात पुणे विरुद्ध कोल्हापूर यांच्यात झालेल्या चुरशीची सामन्यांत पुणे विभागाने ३०-२९ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. तर औरंगाबाद विभागाने मुंबईचा ४४-३५ असा पराभव केला.
मुलाच्या अंतिम सामन्यात औरंगाबाद विभागाने कोल्हापूर विभागाचा ३७-२५ असा सहज पराभव करत राज्यस्तरीय शालेय स्पर्धेचं विजेतेपद पटाकवले. तर मुलीच्या अंतिम सामना अंत्यत चुरशीचा झाला. औरंगाबाद विभागाने शेवटच्या क्षणी १ गुणांनी विजयी मिळवत पुणे विभागाचा पराभव केला.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या मुलाच्या सामना मुंबई विरुद्ध नागपूर सुवर्ण चढाईत मध्ये मुंबई विभागाने जिंकला. तर मुलीच्या तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात कोल्हापूर विभागाने मुंबई विभागाचा ३६-२६ असा पराभव केला.
१९ वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा:-
निकाल मुले विभाग:
प्रथम क्रमांक- औरंगाबाद
द्वितीय क्रमांक- कोल्हापूर
तृतीय क्रमांक- मुंबई
चतुर्थ क्रमांक- नागपूर
निकाल मुली विभाग:
प्रथम क्रमांक- औरंगाबाद
द्वितीय क्रमांक- पुणे
तृतीय क्रमांक- कोल्हापूर
चतुर्थ क्रमांक- मुंबई