सध्या अनेक ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यामधील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेबद्दल आपापले मतं व्यक्त करत आहे. यातच ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डीन जोन्सने वादग्रस्त विधान केले आहे.
“जर भारतीय संघ ही मालिका नाही जिंकला, तर तो कधीच ऑस्ट्रेलियात जिंकणार नाही”, असे जोन्स म्हणाले.
“मात्र जर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी भारतीय कर्णधार विराट कोहलीला प्रवृत्त केले तर त्याचे परिणाम चांगले नसणार. कारण त्याच्यामध्ये चुका शोधणे म्हणजे मोनालिसाच्या पेटींगमध्ये चुका शोधण्यासारखे आहे”, असेही ते पुढे म्हणाले.
तसेच त्यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सल्लेही दिले आणि कोहली बरोबर शाब्दीक चकमकीत पडू नका हा महत्त्वाचा सल्ला दिला
घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे सोपे नाही. मात्र स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत भारतासाठी ही मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे, असे म्हणत त्यांनी या मालिकेचा निकालही सांगितला आहे.
“भारत 2-0 किंवा 3-0 असे जिंकत मालिका खिशात टाकू शकतो. कारण आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल असणाऱ्या भारतीय संघाला हरवणे ऑस्ट्रेलियाला मुश्किल आहे”, असे जोन्स म्हणाले.
आयसीसी कसोटी क्रमवारीत 5व्या स्थानावर असणारा ऑस्ट्रेलिया संघामधील नॅथन लायन भारतीय फलंदाजासाठी धोकादायक ठरू शकतो.
चार सामन्यांच्या कसोटी मालिकोतील पहिला सामना 6 डिसेंबरला अॅडलेडवर खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराटला शत्रू नव्हे, मित्र बनवा; हा अजब सल्ला दिला आहे आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने
–कॅप्टन कूल अनुप कुमार करणार प्रो कबड्डीला अलविदा?
–Video: रशीद खानच्या धोनी स्टाईलने विरेंद्र सेहवाग झाला अचंबित