ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाची अडचणे संपण्याची चिन्हे दिसत नाही. आगामी चार कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी परवापासून (28 नोव्हेंबर) सुरू झालेल्या सराव सामन्यात भारतीय फलंदाज पृश्वी शॉ जखमी झाल्याने त्याच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
त्यातच या सराव सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 358 धावा केल्या. मात्र भारतीय गोलंदाजांनी निराशा केली. या सामन्यात भारताकडून सात खेळाडूंनी गोलंदाजी केली. यामध्ये कर्णधार विराट कोहलीनेही गोलदांजी केली. मात्र एकालाही मोठी भागीदारी तोडण्यात यश येत नव्हते.
ऑस्ट्रेलिया एकादशने पहिल्या विकेटसाठी 114 धावा केल्या. उमेश यादवने त्यांचा कर्णधार सॅम वाईटमनला बाद करत पहिली विकेट घेतली. पण तरीही विरोधी संघाची 213 धावांवर वर दोन बाद ते 234 धावांवर 6 बाद अशी स्थिती झाली.
ऑस्ट्रेलिया एकादशच्या खालच्या फळीतील खेळाडू जरी लवकर बाद झाले असले तरी त्यांचा विकेटकिपर हॅरी नेलसन आणि अरॉन हार्डी या दोघांनी सातव्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली.
ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणारा डार्सी शॉर्टला मोहम्मद शमीने 74 धावांवर बाद केले. तसेच शमीने 67 धावा देत 3 तर यादव आणि आर अश्विन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली आहे.
उद्या या सराव सामन्याचा शेवटचा दिवस असून ऑस्ट्रेलिया एकादश फक्त दोन धावांनी असून 356 धावांवर दोन बाद असा आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–या कारणामुळे बीसीसीआय नाराज, धोनीसाठी धोक्याची घंटा
–टीम इंडियाला मोठा झटका, पृथ्वी शाॅ पहिल्या कसोटीतून बाहेर
–Video: रशीद खानच्या धोनी स्टाईलने विरेंद्र सेहवाग झाला अचंबित