भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८ विकेटने पराभव केला. सामन्यातील पहिले दोन दिवस आघाडीवर असून देखील भारतीय संघाचा तिसऱ्या दिवशी दुसरा डाव केवळ ३६ धावांवर संपुष्टात आला होता. भारतीय खेळाडूंना या पराभवाला विसरणे अवघड जाणार आहे. अशातच भारतीय कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन भारतात परतणार आहे. विराट भारतात परतत असल्यामुळे भारतीय संघातील जोश कमी जाणवेल अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ब्रॅड हॅडिन याने दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना ब्रॅड हॅडिन म्हणाला,’ मला नाही माहित विराटच्या अनुपस्थितीत उर्वरित सामन्यात भारतीय संघ कशाप्रकारे मैदानात उतरेल .विराट आपल्या कृतीने संघात एक जोश व ऊर्जा निर्माण करतो. आता मला हे जाणून घ्यायचे आहे की भारतीय संघ कोठून त्यांची ऊर्जा मिळवतात.’
रोहित शर्मा बद्दल बोलताना हॅडिन म्हणाला,’ मी रोहित शर्माला भारतीय संघात खेळताना बघू इच्छितो. रोहित जर योग्य मानसिक व शारीरिक स्थितीत असेल तर मी त्याला थेट अंतिम ११ मध्ये खेळवेल. माझ्यामते भारतीय संघाला सध्या एका अनुभवी खेळाडूची गरज आहे, जो नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून खेळाडूंचे लक्ष केवळ क्रिकेटकडे वळवेल ‘.
दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वर सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पॉंटिंग, स्टीव वॉ व ब्रॅड हॅडिन यांच्या मते भारतीय संघाला पुनरागमन करणे अवघड जाणार आहे. आता हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ कशाप्रकारे मैदानात पुनरागमन करतो.
महत्त्वाच्या बातम्या –
‘अरुण जेटली स्टेडियमच्या स्टँडवरील माझे नाव तात्काळ हटवण्यात यावे’, बिशनसिंग बेदींची धक्कादायक मागणी
ऐकावं ते नवलंच! चक्क प्रखर उन्हामुळे थांबला न्यूझीलंड-पाकिस्तान सामना; चाहत्यांनी उडवली खिल्ली
टीम इंडियासाठी वाईट बातमी! मोहम्मद शमी ‘इतक्या’ दिवसांसाठी क्रिकेटपासून असणार दूर
ट्रेंडिंग लेख –
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या आयुष्यातील माहीत नसलेल्या ४ गोष्टी
सोळा वर्षे आणि सोळा गोष्टी! जाणून घ्या धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोमांचक प्रवास
‘बॉक्सिंग डे कसोटी’ म्हणजे नक्की आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर