---Advertisement---

भारतीय खेळाडूंच्या गचाळ क्षेत्ररक्षणाने चाहते भडकले, सोशल मिडीयावर व्यक्त केला राग

---Advertisement---

सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आहे. त्या ठिकाणी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्याच्या बॉर्डर गावस्कर मालिका खेळत आहे यातील पहिला सामना 17 डिसेंबर पासून सुरू झाला आहे. यामध्ये भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दमदार दिसून येत आहे, तर क्षेत्ररक्षण मात्र गचाळ होत आहे. त्यामुळे भारतीय संघाविरुद्ध ट्विटरवर जोरदार टीका होत आहे.

पहिल्या सामन्याच्या दुसर्‍या ऑस्ट्रेलिया संघाच्या पहिल्या डावात भारतीय खेळाडू खराब क्षेत्ररक्षण करताना दिसून आले. तरी ही ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू सातत्याने बाद झाले. या डावात खराब क्षेत्ररक्षणाचा कहर करताना भारतीय खेळाडू चार झेल सोडले. त्यानंतर ही भारतीय संघाने सामन्यात वर्चस्व प्रस्थापित करताना ऑस्ट्रेलिया संघाला 191 धावसंख्येवर सर्वबाद करत रोखले. मात्र तरीही चाहते भारतीय संघावर नाराज झाले. भारतीय संघाच्या खराब क्षेत्ररक्षणमुळे ट्विटर प्रतिक्रियांची लाट उसळली. पृथ्वी शॉ, वृद्धीमान साहा, जसप्रीत बुमराह आणि मयांक अग्रवाल या प्रत्येकाने एक झेल सोडला. भारताच्या या गचाळ क्षेत्ररक्षणमुळे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकानांही ट्विटर लक्ष्य केले जात आहे.

पहा काही ट्विट:

https://twitter.com/Jitendra7Jitu/status/1339873998272786432

https://twitter.com/vip15_vip15/status/1339874002509078528

https://twitter.com/srini_vk/status/1339873851740569604

https://twitter.com/SportAuthTweet/status/1339873893914296324

भारतीय खेळाडूंनी सुमार क्षेत्ररक्षण केले असले तरी भारतीय संघाला सुदैवाने त्याचा फार फटका बसला नाही. भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ १९१ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारतीय संघाला पहिल्या डावात ५३ धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या ६ षटकांत १ बाद ९ अशी होती. सलामीवीर मयंक अगरवाल आणि नाईट वॉचमन जसप्रीत बुमराह अनुक्रमे ५ आणि ० धावांवर नाबाद आहेत.

महत्वाच्या बातम्या:
– AUS vs IND Test Live : दुसरा दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावावर; दिवसाखेर भारताला ६२ धावांची आघाडी
– भारतीय क्रिकेटर्सचे सुमार क्षेत्ररक्षण; एक-दोन नव्हे, तब्बल तीनवेळा ऑस्ट्रेलियन फलंदाजाला जीवदान
– ‘उडता कोहली’! भारतीय कर्णधाराने डाइव्ह मारत घेतला भन्नाट झेल, व्हिडिओ जोरदार व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---