ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेदरम्यान भारतीय संघाला दुखापतीची चिंता सतावत आहे. भारताने अनेक फलंदाज या मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाले आहेत. आता नुकतेच सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या कसोटीदरम्यान रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा हे दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत.
पंत स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये –
पंत आणि जडेजाला भारताच्या पहिल्या डावात शनिवारी (९ जानेवारी) फलंदाजी करताना दुखापत झाली. पंतच्या डाव्या हाताच्या कोपराला पॅट कमिन्सचा चेंडू लागला त्यामुळे त्याला शनिवारी दुसऱ्या सत्रानंतर हॉस्पिटलमध्ये स्कॅनसाठी नेण्यात आले आहे. त्याच्याऐवजी वृद्धिमान साहा यष्टीरक्षणासाठी मैदानात आला आहे.
Rishabh Pant was hit on the left elbow while batting in the second session on Saturday. He has been taken for scans. #AUSvIND pic.twitter.com/NrUPgjAp2c
— BCCI (@BCCI) January 9, 2021
जडेजाही दुखापतग्रस्त –
रविंद्र जडेजाला फलंदाजीदरम्यान डाव्या आंगठ्याला मिशेल स्टार्कने टाकलेला बाऊंसर लागला आहे. पण तरीही त्याने फलंदाजी केली होती. मात्र भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपुष्टात आल्यानंतर तो ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरलेला नाही. त्याला देखील स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. जडेजाच्या ऐवजी मयंक अगरवाल क्षेत्ररक्षणासाठी उतरला आहे.
UPDATE – Ravindra Jadeja suffered a blow to his left thumb while batting. He has been taken for scans.#AUSvIND pic.twitter.com/DOG8SBXPue
— BCCI (@BCCI) January 9, 2021
भारत २४४ धावांवर सर्वबाद –
भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून या डावात शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजाराने अर्धशतके केली. या दोघांनीही प्रत्येकी ५० धावा केल्या. त्यांच्या व्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला ५० धावांचा आकडा गाठता आला नाही. त्या दोघांपाठोपाठ रिषभ पंतने सर्वाधिक ३६ धावा केल्या. त्याचबरोबर रविंद्र जडेजाने नाबाद २८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
भारताला दुखापतींचे ग्रहण –
चालू ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रिषभ पंत किंवा रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त होणारा पहिले भारतीय खेळाडू नाही. त्यांच्याआधी मोहम्मद शमी, उमेश यादव आणि केएल राहुल हे तिघेही दुखापतीमुळे या दौऱ्यातील कसोटी मालिकेतून बाहेर पडले आहे. शमीला पहिल्या कसोटीत, उमेशला दुसऱ्या कसोटीत दुखापत झाली. तर केएल राहुलला सरावादरम्यान दुखापत झाली.
महत्त्वाच्या बातम्या –
अरे पळा पळा…! टीम इंडियाचे ‘हे’ 3 पठ्ठे असे झाले रनआऊट, व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल
अरे बापरे! ‘या’ भारतीय फलंदाजांनी कसोटीत खेळलेत १३ हजारपेक्षाही जास्त चेंडू, पुजाराचाही समावेश
आयपीएल २०२१: धोनी ठरणार १५० कोटी कमावणारा पहिला क्रिकेटर, घ्या जाणून रोहित-विराटची कमाई