---Advertisement---

अरे बापरे! ‘या’ भारतीय फलंदाजांनी कसोटीत खेळलेत १३ हजारपेक्षाही जास्त चेंडू, पुजाराचाही समावेश

On: शनिवार, जानेवारी 9, 2021 10:38 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेला तिसरा कसोटी सामना अत्यंत रोमांचक घडीवर आला आहे. या सामन्यात भारताचा डाव २४४ धावांवर संपुष्टात आला आहे. भारताकडून शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजाराने अर्धशतक केले आहे. दरम्यान पुजाराने एक खास विक्रमही केला आहे.

पुजाराला ‘कसोटी स्पेशलिस्ट’ म्हणून ओखळले जाते. हा ३२ वर्षीय शिलेदार मैदानावर अतिशय धिम्या गतीने बचावात्मक फलंदाजी करताना दिसतो. सिडनी येथे चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्यानंतर २८.४१च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत त्याने ५० धावा केल्या. यावेळी तब्बल १७६ चेंडूंचा त्याने सामना केला. यासह पुजारा भारताकडून कसोटीत १३ हजारांहून अधिक चेंडू खेळणाऱ्या फलंदाजाच्या यादीत सहभागी झाला आहे.

आतापर्यंत पुजाराने ८० कसोटी सामने खेळले असून दरम्यान १३००० चेंडूंचा सामना केला आहे. या विक्रमाच्या यादीत ‘द वॉल’ राहुल द्रविड अव्वलस्थानी आहे. द्रविडने त्याच्या कसोटी कारकिर्दीत तब्बल ३१ हजारपेक्षाही जास्त चेंडू खेळले आहेत. तर सचिन तेंडूलकरने २९४३७ पेक्षा अधिक चेंडू खेळत या यादीत दुसऱ्या स्थान मिळवले आहे. याव्यतिरिक्त व्हिव्हिएस लक्ष्मण, सुनिल गावसकर, सौरव गांगुली यांनीही कसोटीत १४ हजारपेक्षा जास्त चेंडूंचा सामना केला आहे.

कसोटीत सर्वाधिक चेंडू खेळणारे भारतीय फलंदाज

३१२५८ चेंडू – राहुल द्रविड
२९४३७ चेंडू + – सचिन तेंडूलकर
१७७८५ चेंडू – व्हिव्हिएस लक्ष्मण
१५३२७ चेंडू + – सुनिल गावसकर
१४०७० चेंडू – सौरव गांगुली
१३००० चेंडू – चेतेश्वर पुजारा

महत्त्वाच्या बातम्या-

IND v AUS Live : खेळपट्टीवर स्थिरावलेले पंत-पुजारा बाद; भारताचा अर्धा संघ तंबूत

“सेंचूरी नंतरची परंपरा…”, सिडनी कसोटीतील धडाकेबाज शतकानंतर स्मिथचं पत्नीसोबत हटके सेलिब्रेशन

कमिन्सच्या सुरेख चेंडूवर कर्णधार अजिंक्य रहाणे बोल्ड, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---