भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे दुसरा कसोटी सामना मेलबर्न येथे शनिवारपासून (26 डिसेंबर) खेळला जाणार आहे. भारताला पहिल्या सामन्यात लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता महान फिरकीपटू शेन वॉर्नने म्हटले आहे की, ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ भारताचा धुरळा उडवेल. सोबतच त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे कौतुकही केले आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या सामन्यात भारताला 36 धावावर गारद करताना 8 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर आता दुसरा सामना विराट कोहलीच्या अनुपस्थित खेळला जाणार आहे. कोहली आपल्या बाळाच्या जन्मासाठी पालकत्व रजेवर मायदेशी परतला आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्त्व अजिंक्य रहाणे करणार आहे.
मोहमद शम्मीच्या न खेळण्याने होणार नुकसान
शेन वॉर्न फॉक्स क्रिकेटसोबत बोलताना म्हणाला, “भारताकडे केएल राहुलसारखे शानदार खेळाडू आहेत. युवा फलंदाज शुबमन गिलसुद्धा संघात असणार आहे. अजिंक्य रहाणेही चांगला खेळाडू आहे आणि चेतेश्वर पुजारा काय करू शकतो हे आम्हाला माहीत आहे. मोहम्मद शम्मी न खेळणे हे एक मोठे नुकसान आहे. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे, मेलबर्न क्रिकेटचे मैदान त्याच्या गोलंदाजीसाठी अनुकूल होते.”
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे केले कौतुक
पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाल्याने त्यांच्यावर खूप टीका करण्यात आली. मात्र, शेन वॉर्न याचे म्हणणे आहे की भारतीय संघाला दोष देण्यापेक्षा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे कौतुक करायला पाहिजे. तो म्हणाला की, “मी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना श्रेय देईल. त्यांनी इतकी उत्कृष्ट कामगिरी केली. चारही गोलंदाजांनी आणि कॅमरॉन ग्रीन यांनी मिळून चांगले प्रदर्शन केले. हे महान गोलंदाज होत चालले आहेत.”
शेन वॉर्न पुढे म्हणाला, “पॅट कमिन्स, जोश हेझलवूड मिशेल स्टार्क आणि नॅथन लायन हे खूप दिवसांपासून चांगली कामगिरी करत आहेत. निश्चितपणे त्यांची तुलना माझ्यासोबत खेळत असलेल्या गोलंदाजांसोबत होईल. जर पुढील चार- पाच वर्ष अशी कामगिरी करत राहिले, तर हे कदाचित ऑस्ट्रेलियाचे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आक्रमण असेल.”
पहिल्या सामन्यात दोन्ही डावात पॅट कमिन्सने 7 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर दुसर्या डावात जोश हेझलवूडने दुसर्या डावात 8 धावा देताना 5 विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
‘भारतीय संघात वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम’, माजी दिग्गजाची टीका
अवघ्या एक रुपयात पोटभर जेवण.! भारताच्या माजी खेळाडूने सुरू केले गरजूंसाठी उपहारगृह
गल्ली क्रिकेट खेळणाऱ्या चिमुकल्यात दिसली वॉर्नरची झलक; चाहत्यांचा व्हिडिओला मोठा प्रतिसाद