---Advertisement---

AUS Vs NZ : पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा शेवटच्या बॉलवर थरारक विजय, न्यूझीलंडला 6 विकेट्सने दिली मात

On: बुधवार, फेब्रुवारी 21, 2024 5:05 PM
---Advertisement---

AUS Vs NZ :  वेस्ट इंडिज विरुद्ध मायदेशात टी 20, वनडे आणि कसोटी मालिका खेळल्यानंतर आता ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड दौऱ्यात एकूण 2 मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी 20 आणि कसोटी मालिका होणार आहे. तसेच पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर दमदार विजय मिळवला आहे. 

याबरोबरच वेलिंग्टन स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी देखील घेतली आहे. तर या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता. त्यामुळे न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 216 धावांचं आव्हान दिलं होतं. तर ऑस्ट्रेलियाने हे आव्हान शेवटच्या बॉलवर पूर्ण केलं आहे. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या बॉलवर विजयासाठी 4 धावांची गरज असताना टीम डेव्हिडने चौकार मारुन ऑस्ट्रेलियाला हा विजय मिळवून दिला आहे.

ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड आणि मिचेल मार्श या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद आणि निर्णायक 44 धावांची भागीदारी केली आहे. तर या भागीदारीत टीम डेव्हिडने सर्वाधिक धावा केल्या आहेत. यामध्ये टीम डेव्हिडने फक्त  10 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 31 धावा केल्या. तर मिचेलने 44 बॉलमध्ये नॉट आऊट 72 रन्स केल्या. मिचेलच्या या खेळीत 7 सिक्स आणि 2 चौकारांचा समावेश होता.

दरम्यान, याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला असताना युवा रचीन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनव्हे या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने 3 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 215 धावा केल्या होत्या. यामध्ये रचिनने 35 बॉलमध्ये 68 धावा केल्या. तर कॉनव्हे याने 46 बॉलमध्ये 63 धावांचं योगदान दिलं आहे. तर ओपनर फिन एलेन याने 32 धावा केल्या आहेत. तर ग्लेन फिलीप्स याने 19* आणि मार्क चॅपमन याने नाबाद 18 धावा केल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श या तिघांनी 1-1 विकेट घेतली आहे.

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | मिचेल सँटनर (कॅप्टन), फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जोश क्लार्कसन, ॲडम मिल्ने, ईश सोधी, टीम साउथी आणि लॉकी फर्ग्युसन.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), टीम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---