न्यूझीलंडचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या (AUSvsNZ) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. त्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना रविवारी (11 सप्टेंबर) कॅझॅलेज स्टेडियम, कैरन्स (Cairns) येथे खेळला जात आहे. हा सामना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच याच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय वनडे सामना ठरला. यावेळी तो 5 धावा करताच बाद झाला तर स्टिव्ह स्मिथ याने शतकी खेळी केली आहे. मागील काही वनडे सामन्यांमध्ये त्याचा फॉर्म परतताना दिसला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याने न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत 105 धावा केल्या. त्याचे हे वनडेतील 12वे शतक ठरले आहे. तसेच तब्बल दोन वर्षानंतर त्याने वनडेमध्ये शतकी खेळी केली आहे. तो कसोटीमध्ये स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो, मात्र वनडेमध्ये स्मिथ काहीसा मागे पडला होता. आता वनडेत त्याचा फॉर्म परतला असून तो उत्तम कामगिरी करत आहे.
स्मिथचे हे वनडेच्या मागील 11 डावांमधील तिसरे शतक आहे. त्याने वनडेच्या मागील 11 डावांमध्ये 105, 104, 7, 53, 28, 48*, 47*, 1, 1, 61 आणि 105 धावा केल्या आहेत.
An ODI hundred for Steve Smith after two years!
Watch #AUSvNZ on https://t.co/MHHfZPyHf9 (in select regions) 📺#CWCSL | Scorecard: https://t.co/MMqsSFc5GP pic.twitter.com/9wfQNoK8eS
— ICC (@ICC) September 11, 2022
स्मिथने 135 सामन्यात शतकी कामगिरी केली आहे. त्याने सर्वाधिक वनडे शतके भारताविरुद्ध (5) झळकावली आहेत, तर न्यूझीलंड विरुद्ध हे त्याचे दुसरे शतक आहे. तसेच त्याने 27 अर्धशतकेही केली आहेत. त्याचबरोबर हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 40वे शतक ठरले आहे. त्याने कसोटीमध्ये 28 शतके केली आहेत.
सध्या खेळत असलेल्या पुरूष खेळाडूंमध्ये स्मिथ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्यांमध्ये पाचव्या स्थानावर आहे. या यादीत भारताचा विराट कोहली (Virat Kohli) 71 शतक करत पहिल्या स्थानावर आहे. तर इंग्लंडचा जो रूट (Joe Root) हा 44 शतके करत दुसऱ्या स्थानावर आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणारे सक्रिय खेळाडू
71 विराट कोहली
44 जो रूट
43 डेविड वॉर्नर
41 रोहित शर्मा
40 स्टिव्ह स्मिथ
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकासाठी माजी दिग्गजाने निवडला भारतीय संघ! आशिया चषकात नसलेल्या ‘या’ खेळाडूंना दिलंय स्थान
आशिया चषकातील खराब कामगिरीनंतर जॉन्टी रोड्सचा भारतीय संघाला विशेष सल्ला! म्हणाला…
शेवटचा वनडे सामना खेळणाऱ्या फिंचवर साउदीने नाही दाखवली दया, पाहा कसा उडवला त्रिफळा