Pat Cummins Bold Babar Azam: मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात 318 धावांवर गाशा गुंडाळला. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली राहिली. मात्र, त्यानंतर त्यांनी झटपट विकेट्स गमावल्या. यामध्ये माजी कर्णधार बाबर आझम याच्या विकेटचाही समावेश होता. तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याला फक्त 1 धाव करून तंबूत परतावे लागले. आता त्याच्या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कर्णधार पॅट कमिन्सने उडवला त्रिफळा
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी मार्नस लॅब्युशेन (63) याच्या अर्धशतकाच्या जोरावर 96.5 षटकात 10 विकेट्स गमावत 318 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून यावेळी गोलंदाजी करताना आमिर जमाल याने पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी प्रदर्शन करत 3 विकेट्स घेतल्या. सर्वात खास बाब ही होती की, पाकिस्तानने शानदार क्षेत्ररक्षण केले. मोहम्मद रिझवानने यष्टीमागे जबरदस्त झेल पकडला. याव्यतिरिक्त इतर क्षेत्ररक्षकांनीही चांगले प्रदर्शन केले.
या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघासाठी अब्दुल्ला शफीक याने 62, तर कर्णधार शान मसूद याने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र, माजी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) मोठे योगदान देऊ शकला नाही. तो 1 धाव करून तंबूत परतला. त्याला कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने 37व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्रिफळाचीत बाद केले. बाबरने त्याच्या खेळीत 7 चेंडूंचा सामना केला होता.
डिफेंड करण्याच्या प्रयत्नात उडाला त्रिफळा
कमिन्सच्या गोलंदाजीवर बाबर आझम याला काहीच समजले नाही. चेंडू सरळ स्टम्पवर जाऊन लागला. त्याने चेंडूला डिफेंड करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅट आणि पॅडच्या मधून थेट बेल्सवर जाऊन लागला. आता तो ज्या पद्धतीने बाद झाला, त्यामुळे नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
Cummins destroyed Babar Azam at the MCG.pic.twitter.com/nuIgqqDbr6
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 27, 2023
खरं तर, यापूर्वी खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यातही पाकिस्तान संघाला वाईटरीत्या पराभवाचा सामना करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटीत पाकिस्तानला 360 धावांनी पराभवाचा धक्का दिला होता. (aus vs pak captain pat cummins clean bowled babar azam see video here)
हेही वाचा-
Boxing Day Test । राहुलच्या शतकाच्या जोरावर भारताची 245 धावांपर्यंत मजल, आता गोलंदाजांची कसोटी
नाद नाद नादच! संघ अडचणीत असताना KL राहुलची क्लास Century, गगनचुंबी षटकाराने ठोकलं शतक





