ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेटपटू डेलिसा किमिंस आणि लॉरा हॅरिस यांनी रविवारी (१६ ऑगस्ट) लग्न केले आहे. ही जोडी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होती. डेलिसा आणि लॉरा बिग बॅश लीगच्या (बीबीएल) चॅम्पियन संघ ब्रिसबेन हीट संघाचा भाग आहेत. त्यांनी बीबीएलचा अंतिम सामना खेळल्यानंतर त्यांच्या साखरपुड्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. त्यांनी एप्रिलमध्ये लग्न करणार असल्याचेही सांगितले होते.
मात्र, कोरोना व्हायरसमुळे धूमधडाक्यात लग्न करण्याची परवानगी नव्हती. अशात डेलिसा आणि लॉरा यांनी त्यांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली होती. पण आता त्यांनी सर्व परंपरांचे पालन करत लग्न केले आहे. Delissa Kimmince And Laura Harris Married On 16 August 2020
डेलिसाने इंस्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचे सुंदर फोटो शेअर करत एक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये तिने लिहिले आहे की, “आमच्या जिवनाच्या या सुंदर दिवसाला वास्तव बनवण्यासाठी सर्वांचे आभार. सदैव आमच्यासोबत उभे राहिलेल्या सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळीचे आभार.”
https://www.instagram.com/p/CD8OEQhBECk/?utm_source=ig_web_button_share_sheet
डेलिसाने ऑस्ट्रेलियाकडून १६ वनडे सामने खेळत ७९ धावा केल्या आहेत. तर, १४ विकेट्स घेतल्या आहेत. टी२० क्रिकेटमध्ये तिने ४१ सामने खेळत १६२ धावा आणि ३९ विकेट्स घेतल्या आहेत. मार्च २०२०मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या टी२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात डेलिसा ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होती. तर, लॉरा हेरिस देशांतर्गत क्रिकेट खेळते. तसेच ती बिग बॅश लीगमध्येही खेळताना दिसून येते.
डेलिसा आणि लॉरापुर्वी अनेक महिला क्रिकेटपटूंनी एकमेकांशी लग्न केले आहे. न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू ली ताहुआ आणि एमी सॅर्टवाईट यांनीही २०१७मध्ये लग्न केले होते. तर, दक्षिण आफ्रिकाच्या डन वॉन नकेर्कने मार्जियाने कपसोबत २०१८मध्ये लग्न केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून सचिन बीसीसीआयला म्हणाला, धोनीलाच बनवा कर्णधार
सीपीएल २०२० ड्रीम ११ : जमैका तल्लावाज विरूद्ध सेंट लुसिया झुक्स
ट्रेंडिंग लेख –
धोनी-रैनानंतर ‘हे’ ५ भारतीय खेळाडू देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करु शकतात अलविदा
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीचे ५ असे निर्णय, ज्याचा झाला टीम इंडियाला मोठा फायदा
धोनीच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाकडे आहेत या ५ युवा यष्टीरक्षकांचा पर्याय