ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे देश एकमेकांचे शेजारी आहेत. परंतु, क्रिकेटच्या मैदानावरील हे दोन प्रतिस्पर्धी 32 वर्षानंतर (After 32 Years Later) बॉक्सिंग डे (Boxing Day) कसोटीसाठी गुरुवारी (26 डिसेंबर) मेलबर्न (Melbourne) क्रिकेट मैदानावर आमने-सामने येणार आहेत.
या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंड (New Zealand) या संघातील कसोटी सामन्यासाठी पहिल्याच दिवशी 75 हजार प्रेक्षक येण्याची शक्यता आहे.
यापूर्वी न्यूझीलंडने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्नमध्ये शेवटचा बाॅक्सिंग डे कसोटी सामना 1987 मध्ये खेळला होता. त्यावेळी सध्या न्यूझीलंडच्या संघात असणाऱ्या केवळ नील वॅगनर (Neil Wagner), राॅस टेलर (Ross Taylor), बीजे वाॅटलिंग (BJ Watling) आणि कॉलिन डी ग्रॅंडहोम(Colin de Grandhomme) या खेळाडूंचा जन्म झाला होता.
“प्रत्येकजण बाॅक्सिंग डे कसोटी सामना पाहतच मोठा झाला आहे. प्रेक्षक आणि इतिहास याचे साक्षीदार आहेत. तसेच, न्यूझीलंडला 30 वर्षांपेक्षा अधिक काळ बाॅक्सिंग डे कसोटी येथे(मेलबर्न) खेळण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे हा सामना वेगळा असणार आहे,” असे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी (Tim Southee) यावेळी म्हणाला.
न्यूझीलंडने या कसोटी सामन्यासाठी आपल्या संघात बदल केला आहे. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) दुखापतीतून बरा झाला आहे. तर, जीत रावल (Jeet Raval) ऐवजी सलामीवीर म्हणून टाॅम ब्लंडेलला (Tom Blundell) स्थान देण्यात आले आहे.
बोल्टला दुखापतीमुशे पर्थमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळता आले नव्हते. तसेच आता टाॅम लॅथमसोबत (Tom Latham) ब्लंडेल सामन्याची सुरुवात करेल.
ब्लंडेलने आतापर्यंत फक्त 2 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने शेवटचा सामना 2017 मध्ये खेळला होता. तसेच, या शेवटच्या सामन्यातही त्याने आठव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. ब्लंडेल हा सहसा मधल्या फळीत फलंदाजी करण्यासाठी उतरत होता.
ऑस्ट्रेलिया सहसा आपल्या चार मुख्य गोलंदाजांसोबत खेळत आला आहे. ज्यामध्ये 3 वेगवान गोलंदाज आणि 1 फिरकीपटू गोलंदाजाचा समावेश होत असतो. क्रिकेट ऑस्ट्रेलियानुसार यापूर्वी 2013मध्ये श्रीलंकेविरुद्ध सिडनी कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया 5 मुख्य गोलंदाजांसोबत खेळली होती.
बाॅक्सिंग डे कसोटी सामन्यात जर ऑस्ट्रेलिया पाच गोलंदाजांना खेळवणार असेल, तर यामध्ये मिशेल स्टार्क (Mitchell Starc), पॅट कमिन्स (Pat Cummins), नॅथन लायन (Nathon Lyon) आणि मायकेल नसेर (Michael Naser) या खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो.
तसेच, दुखापतग्रस्त खेळाडू जाॅश हेझलवूडचा बदली खेळाडू म्हणून जेम्स पॅटिन्सनला (James Pattinson) घेतील. त्यामुळे ट्रेविस हेडला (Travis Head) संघाबाहेर बसावे लागू शकते.
ऑस्ट्रेलियाने पर्थमध्ये पहिला कसोटी सामना 296 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता आणि कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती.
…आणि सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी कूकने दवडली !!!
वाचा👉https://t.co/pbQ7niejv3👈#म #मराठी #Cricket #HappyBirthdayCook @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 25, 2019
…आणि सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी कूकने दवडली !!!
वाचा👉https://t.co/pbQ7niejv3👈#म #मराठी #Cricket #HappyBirthdayCook @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 25, 2019