मुंबई । ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने पुढच्या महिन्यात होणार्या इंग्लंड दौर्यासाठी 21 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. दोन्ही संघांमध्ये तीन टी 20 आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळल्या जातील. ऑस्ट्रेलिया संघात तीन नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. या संघात रिले मेरीडिथ, जोश फिलिप आणि डॅनियल सायम्स हे नवे चेहरे आहेत. त्यांना इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण करण्याची संधी मिळू शकेल.
काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना सराव करण्याची परवानगी दिली होती. 24 ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडमध्ये दाखल होईल. त्यांनंतर खेळाडूंना पाच दिवस क्वारंटाईनमध्ये रहावे लागेल. यावेळी खेळाडूंची कोरोना टेस्ट होईल, ज्यामध्ये खेळाडू निगेटिव्ह आढळल्यानंतर मालिका खेळण्याची परवानगी दिली जाईल.
संघाचे नेतृत्व ऍरोन फिंच करीत आहेत. स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, मार्नस लबूशेने यांच्यावर संघाच्या फलंदाजीची जबाबदारी असेल तर गोलंदाजीची जबाबदारी मिचेल स्टार्क, अँन्ड्र्यू टाय आणि पॅट कमिन्स यांच्याकडे दिली आहे. कोरोना व्हायरस नंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणारा ऑस्ट्रेलिया हा संघ तिसरा संघ आहे. त्यापूर्वी वेस्टइंडीज आणि पाकिस्तानने इंग्लंडचा दौरा केला आहे.
इंग्लंड दौर्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ :
अॅरॉन फिंच (कर्णधार), सीन एबॉट, अॅश्टन एगर, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, जोश हेजलवुड, मार्नुस लॅबुशेन, नॅथन लायोन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, रिले मेरिडिथ, जोश फिलिप, डॅनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्मिथ , मिशेल स्टार्क मार्कस स्टोईनिस, अँड्र्यू टाय, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर आणि अॅडम जॅम्पा.