पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात शनिवारपासून (२६ डिसेंबर) मेलबर्नच्या मैदानावर दुसऱ्या कसोटी सामन्याची लढत होणार आहे. या लढतीत भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अनुपस्थित असणार आहेत. त्यामुळे भारतीय संघाच्या समस्या वाढल्या असल्याचे दिसत आहे. अशात माजी भारतीय क्रिकेटपटू के श्रीकांत यांनी भारतीय संघाला ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात खचून न जाता आत्मविश्वासाने खेळण्याचा सल्ला दिला आहे.
श्रीकांत म्हणाले की, “ऑस्ट्रेलिया संघाचे गोलंदाजी आक्रमण मजबूत आहे. परंतु ऑस्ट्रेलियाची फलंदाजी जास्त मजबूत नाही. त्यामुळे भारतीय संघ नक्कीच ऑस्ट्रेलियाला काट्याची टक्कर देऊ शकेल.”
भारतीय संघाने दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न करावा
तसेच पुढे विराटच्या वक्तव्याविषयी बोलताना श्रीकांत म्हणाले की, “पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर विराटने संघातील खेळाडूंच्या उणीवा सांगितल्या होत्या. त्याने सांगितलेल्या कमतरता अगदी खऱ्या होत्या. भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी सकारात्मक विचारांनी मैदानावर उतरायला हवे होते. त्यांची मानसिकता फक्त बचावात्मक खेळी करण्याची होती. ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत विराट आणि शमी नसल्यामुळे भारतीय संघाला समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. तरीही त्यांनी मजबूतीने पुनरागमन करण्याच्या हेतूने दमदार प्रदर्शन करायला पाहिजे.”
ऍडलेड कसोटीतील पराभव वाईट स्वप्नाप्रमाणे
“पहिल्या कसोटी सामन्यातील पराभव सर्वांनी एका वाईट स्वप्नाप्रमाणे घेतला. सर्वांना या गोष्टीचे खूप वाईटही वाटले. पण आपल्याला ही गोष्ट विसरुन चालणार नाही की ऑस्ट्रेलियाची फलंदाजी जास्त चांगली नाही. त्यांची फलंदाजी ३० टक्के डेविड वॉर्नर आणि ३० टक्के स्टिव्ह स्मिथवर टिकून आहे. उर्वरित खेळाडूंची फलंदाजी मिळून ३० टक्के होते. त्यामुळे त्यांच्या फलंदाजीच्या तुलनेत त्यांची गोलंदाजी जास्त दमदार आहे,” असे म्हणत श्रीकांत यांनी भारतीय संघाला प्रोत्साहित करण्याता प्रयत्न केला.
ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ८ विकेट्सने पराभूत केले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे आणि येत्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीतही आत्मविश्वासाने भारतावर मात करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार. याउलट पहिल्या सामन्यातील पराभवामुळे खचलेल्या भारतीय संघाला दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
व्हिडिओ : फलंदाज बाद नसूनही अंपायरने दिले आऊट; समालोचक वैतागून म्हणाला, “बस आता खूप झालं”
अजित आगरकर का नाही बनला टीम इंडियाचे निवडकर्ता? घ्या जाणून
…म्हणून ऍलिस्टर कूकला इशांत शर्माची विकेट घेतल्याचा पश्चाताप