वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (11 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश असा सामना खेळला गेला. पुणे येथील गहुंजे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने बांगलादेशवर वर्चस्व गाजवले. विजयासाठी मिळालेल्या 307 धावांचा पाठलाग करताना त्यांनी केवळ दोन गडी गमावत विजय मिळवला. मिचेल मार्श याचे नाबाद शतक निर्णायक ठरले. वनडे विश्वचषक इतिहासात ऑस्ट्रेलियाने पार केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली.
An imperious 177* from Mitchell Marsh helps him win the @aramco #POTM 🔥#CWC23 | #AUSvBAN pic.twitter.com/WwvPKoim6r
— ICC (@ICC) November 11, 2023
यापूर्वीच उपांत्य फेरीत जागा मिळवलेल्या ऑस्ट्रेलिया समोर स्पर्धेतून बाहेर पडलेल्या बांगलादेश ने 307 धावांचे मोठे आव्हान उभे केले. वॉर्नर व हेड यांनी अर्धशतकी सलामी देत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. हेड बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या मार्श याने आपला शानदार फॉर्म कायम राखला. त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांवर आक्रमण करत आधी अर्धशतक पूर्ण केले.
त्याला डेव्हिड वॉर्नर याने देखील अर्धशतक करून साथ दिली. वॉर्नर बाद झाल्यानंतरही मार्श याने 87 चेंडूंमध्ये विश्वचषकातील आपले दुसऱे शतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने स्मिथ याने देखील स्पर्धेतील आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले. मार्शने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठी धावसंख्या करत 177 धावा केल्या.
तत्पूर्वी, बांगलादेशच्या सर्वच फलंदाजांना चांगले सुरुवात मिळाली होती. मात्र, तौहिद हृदय वगळता कोणालाही अर्धशतक पूर्ण करता आले नाही. त्यामुळे बांगलादेशचा डाव 306 पर्यंत मर्यादित राहिला. ऑस्ट्रेलियासाठी ऍडम झम्पा व सीन ऍबॉट यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
(Australia Beat Bangaladesh By 8 Wickets Mitchell Marsh Hits Unbeaten Century)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानविरुद्धचा सामना माझा कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो, इंग्लंडच्या खेळाडूचं धक्कादायक विधान
शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरच्या नात्यावर लागली मोहर! खास व्यक्तिने महत्वाची माहिती