भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्याच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. ऑस्ट्रेलियन संघाने मुंबई येथे झालेला पहिला पराभवाचे उट्टे काढत यजमान संघाला 10 गडी राखून पराभूत केले. मिचेल स्टार्कने पाच बळी मिळवल्यानंतर 117 धावांचा पाठलाग करताना मिचेल मार्श व ट्रेविस हेड यांनी नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.
2ND ODI. Australia Won by 10 Wicket(s) https://t.co/dzoJxTOHiK #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) March 19, 2023
नाणेफेक गमावल्याने प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर भारतीय फलंदाज या संधीचा फायदा घेऊ शकले नाहीत. मिचेल स्टार्कच्या चार बळींमुळे भारतीय संघाचे पाच फलंदाज केवळ 49 धावांमध्ये माघारी परतले. विराट कोहलीने 31 व अक्षर पटेलने नाबाद 29 धावा केल्यामुळे भारतीय संघाला कशीबशी 117 पर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्क याने सर्वाधिक 5 बळी मिळवले. त्याला ऍबॉट व एलिस यांनी अनुक्रमे तीन व दोन बळी घेत साथ दिली.
विजयासाठी मिळालेल्या तुटपुंज्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियासाठी मिचेल मार्श व ट्रेविस हेड हे सलामीला उतरले. दोघांनी पहिल्या षटकापासूनच सामना लवकरात लवकर संपवण्याचा मनसुबा ठेवल. भारताच्या प्रत्येक गोलंदाजावर त्यांनी हल्ला चढवला. मार्शने केवळ 28 चेंडूवर आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने त्याला हेडनेदेखील तशीच साथ दिली. मार्शने अखेरपर्यंत नाबाद राहत 36 चेंडूत 6 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने 66 धावा केल्या. तर, हेडने नाबाद 51 धावा फटकावल्या. मालिकेतील अखेरचा सामना 22 जानेवारी रोजी चेन्नई येथे खेळला जाईल.
(Australia Beat India By 10 Wickets In Vizag ODI Starc Marsh Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्टार्कच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांची दाणादाण! टीम इंडिया 117 धावांवर ऑलआउट
स्मिथने चित्त्याच्या चपळाईने घेतला कॅच, ऑस्ट्रेलियन कर्णधाराची लवचिकता पाहून रोहित अवाक