वनडे विश्वचषक 2023 मध्ये बुधवारी (25 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स असा सामना खेळला गेला. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 309 धावांनी ऐतिहासिक विजय साकारला. डेव्हिड वॉर्नर व ग्लेन मॅक्सवेल यांनी ठोकलेल्या तुफानी शतकांनंतर ऍडम झम्पा याने चार बळी घेत नेदरलँडचा डाव केवळ 90 धावांमध्ये गुंडाळला. हा विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला.
https://twitter.com/ICC/status/1717195166660939929?t=z6lr0If5btl5qPZ7sRwvLA&s=19
(Australia Beat Netherlands By 309 Runs Warner Maxwell Zampa Shines)






