दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला बुधवारी (30 ऑगस्ट) सुरुवात झाली. डर्बन येथे सुरू झालेल्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने जबरदस्त सांघिक खेळ दाखवला. आधी कर्णधार मिचेल मार्श व टीम डेव्हिड यांनी तुफानी अर्धशतके केल्यानंतर पदार्पण करणारा फिरकीपटू तनवीर सांघा याने चार बळी घेतल्याने, ऑस्ट्रेलियाने तब्बल 111 धावांनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार मिचेल मार्श व टीम डेव्हिड यांनी वादळी फटकेबाजी केली. मार्शने आपल्यावरील जबाबदारी योग्यरीतीने पार पाडत 49 चेंडूवर 92 धावांची नाबाद खेळी केली. तर दुसऱ्या बाजूने डेव्हिड याने अवघ्या 28 चेंडूंमध्ये 64 धावा कुटल्या. त्यांच्या या फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकात 226 धावा उभ्या केल्या.
या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव पहिल्या षटकापासून घसरायला सुरुवात झाली. सलामीवीर रिझा हॅन्ड्रिक्स वगळता इतर कोणताही फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीचा सामना करू शकला नाही. या सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा लेगस्पिनर तनवीर सांघा याने यजमानांच्या डावाला सुरुंग लावला. त्याने अवघ्या 31 धावा देत आपल्या चार षटकात चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. वेगवान गोलंदाजांनी अखेरचे फलंदाज झटपट बाद करत दक्षिण आफ्रिकेचा डाव 115 धावांवर संपवत तब्बल 111 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. मालिकेतील उर्वरित दोन सामने जिंकून मालिका आपल्या नावे करण्याचा प्रयत्न आता यजमान संघ करेल.
(Australia Beat South Africa By 111 Runs In First T20I At Durban Marsh David Sangha Shines)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानची आशिया चषकात विजयी सलामी, नवख्या नेपाळचा 238 धावांनी पराभव
“भारत-पाकिस्तान द्वंद्व ऍशेसपेक्षा सरस”, ऑसी दिग्गजाने दिली कबुली