---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिजवर रोमांचक विजय; फिंचची ‘कॅप्टन्स इनिंग’

On: बुधवार, ऑक्टोबर 5, 2022 6:51 PM
---Advertisement---

टी20 विश्वचषकाच्या ऐन तोंडावर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान तीन सामन्याच्या टी20 मालिकेला क्वीन्सलॅंड येथे सुरुवात झाली. कमी धावसंख्येचा होऊनही हा पहिला सामना अत्यंत रोमांचक झाला. ऑस्ट्रेलियाने तीन गडी राखून विजय संपादन करून मालिकेत आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने झळकावलेले अर्धशतक ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

 

क्वीन्सलॅंड येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कोणत्याही वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. सलामीवीर कायले मायर्सने सर्वाधिक 39 धावा केल्या. अष्टपैलू ओडेन स्मिथने 17 चेंडूवर 27 धावा करत संघाला 145 पर्यंत मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियासाठी पॅट कमिन्सने सर्वाधिक तीन, तर मिचेल स्टार्क व जोस हेजलवूडने दोन बळी आपल्या नावे केले.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर व युवा कॅमेरून ग्रीन ही नवी सलामीची जोडी मैदानात उतरवली. मात्र, ते दोघे मोठी खेळी करू शकले नाहीत. दोघांनी प्रत्येकी 14 धावा केल्या. मिचेल मार्श 3 तर मॅक्सवेल व टीम डेव्हिड खातेही खोलू शकले नाहीत. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार ऍरॉन फिंचने ऑस्ट्रेलियन डावाची जबाबदारी घेत 53 चेंडूवर 58 धावांची संघर्षपूर्ण खेळी केली. मागील अनेक सामन्यात संघासाठी फिनिशरची भूमिका बजावलेल्या मॅथ्यू वेडने अखेरपर्यंत नाबाद राहत 39 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

या मालिकेत आणखी दोन सामने खेळले जातील. त्यानंतर 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

मैदानापासून दूर असतानाही बेअरस्टोने नावे केला मानाचा पुरस्कार; हे खेळाडूही बनले मानकरी
रोहितचा प्रश्नच मिटला! विश्वचषकात फ्लॉप ठरताच ‘हे’ 3 खेळाडू घेऊ शकतात त्याची जागा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---