ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यानच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळला गेला. यजमान ऑस्ट्रेलियाने या सामन्यात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत वेस्ट इंडिजला 164 धावांनी पराभूत केले. पहिल्या डाव्यात द्विशतक आणि दुसऱ्या डावात शतक करणारा ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅब्युशेन हा सामन्याचा मानकरी ठरला.
Australia win 🎉
Nathan Lyon sends West Indies packing with a match-winning six-for 🔥
Watch the #AUSvWI series live on https://t.co/CPDKNxpgZ3 (in select regions) 📺#WTC23 | Scorecard: https://t.co/YyderoqpP2 pic.twitter.com/3Il9j6hBNL
— ICC (@ICC) December 4, 2022
पर्थ येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या दिवसापासून वर्चस्व गाजवले. सलामीवीरांना अपयश आल्यानंतर कसोटी संघाचे प्रमुख फलंदाज असलेल्या स्टीव्ह स्मिथ व मार्नस लॅब्युशेन यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव पुढे नेला. दोघांनीही द्विशतके पूर्ण केली. ट्रेव्हीस हेड याने देखील 99 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने त्यानंतर 4 बाद 598 वर आपला डाव घोषित केला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. दोन्ही सलामीवीरांनी झळकावलेल्या अर्धशतकांतरही त्यांचा डाव केवळ 283 धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्य डावात 315 धावांची आघाडी मिळाली.
त्यानंतर दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाने तशीच फलंदाजी केली. लॅब्युशेनने पुन्हा एकदा आपल्या बॅटचे पाणी दाखवत शानदार शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात केवळ 37 षटके फलंदाजी केली व धावफलकावर 182 धावा लावल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजला विजयासाठी 498 धावांचे मोठे लक्ष मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघासाठी कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने एकाकी लढत दिली. त्याने शतक साजरे केले. तरीही वेस्ट इंडीजचा डाव केवळ 333 धावांवर आटोपला. परिणामी, संघाला 164 धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. मालिकेतील दुसरा सामना 8 डिसेंबरपासून ऍडलेड येथे खेळला जाईल.
(Australia Beat West Indies In Perth Test By 164 Runs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबाद एफसी विजयी मार्गावर परतण्यासाठी चेन्नईयन एफसीला भिडणार
शाकिबच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांचे लोटांगण, विजयासाठी बांगलादेशला दिले 187 धावांचे लक्ष्य