---Advertisement---

WTC 2025 Final: पॅट कमिन्सची मोठी मागणी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार नक्की काय म्हणाला?

On: मंगळवार, जून 10, 2025 1:02 PM
Pat-Cummins
---Advertisement---

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC WTC 2025) 2025 चा अंतिम सामना यावेळी ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका (AUS vs SA) यांच्यामध्ये होणार आहे. हा सामना 11 जून पासून इंग्लंडच्या लॉर्ड्समध्ये खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा या ट्रॉफीवर वर्चस्व करण्याच्या प्रयत्नात असेल. तसेच फायनल सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) एक मोठ्या बदलाची मागणी केली आहे. फायनल सामन्याच्या ठिकाणाविषयी पॅट कमिन्सने मोठे वक्तव्य केले आहे.

रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने डब्ल्यूटीसीच्या (WTC) ठिकाणाविषयी म्हटले, जो संघ मागच्या चक्राचा विजेता असेल त्याला पुढच्या सत्राची फायनल होस्ट करण्याची जबाबदारी मिळायला हवी. हे जरी ठीक असेल की, फायनल लॉर्ड्समध्ये होत आहे. हे खूप चांगलं मैदान आहे आणि असं वाटत आहे की, एकाच ठिकाणी खेळणं सोपं काम आहे.

आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेचे दोन फायनल खेळले गेले आहेत आणि हे दोन्ही फायनल लॉर्ड्समध्ये खेळले गेले आहेत. पहिल्या सत्राच्या फायनलमध्ये न्युझीलँडने टीम इंडियाला पराभूत करून ट्रॉफी जिंकली होती, तसेच दुसऱ्या सत्राच्या फायनलमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.

कसोटी फॉरमॅटमध्ये आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात 123 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 54 सामन्यात विजय मिळवला आहे तसेच साउथ आफ्रिकेने फक्त 26 सामने जिंकले आहेत. याशिवाय 21 सामने ड्रॉ झाले आहेत. मागच्या 10 वर्षांपासून साउथ आफ्रिकेचं ऑस्ट्रेलियावर पारडं जड आहे. 2015 पासून आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये 10 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 5 सामने आफ्रिका आणि 4 ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत.

टेम्बा बावुमाच्या नेतृत्वात साउथ आफ्रिका सातत्याने चांगले प्रदर्शन करत आहे. बावुमाच्या नेतृत्वात आत्तापर्यंत साऊथ आफ्रिकेने एकही कसोटी सामना गमावलेला नाही. अशा परिस्थितीत साउथ आफ्रिकेच्या नजरा पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर असतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---