सध्या क्रिकेटविश्वात एकामागोमाग अनेक कसोटी सामने सुरू आहेत. रविवारी (18 डिसेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश (BANvIND) या सामन्याबरोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण (AUSvSA) आफ्रिका संघाच्या पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल लागला. ब्रिसबेन येथे खेळला गेलेला हा सामना ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने जिंकला, मात्र या विजयासाठी यजमानांना चांगलाच घाम गाळावा लागला आहे. त्याचे प्रमुख कारण ठरला कागिसो रबाडा.
दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका आणि तेवढ्याच सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली असून आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत पहिले स्थान कायम राखले आहे.
गाबावर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय़ गोलंदाजांनी योग्य ठरवला आणि पाहुण्या संघाचा पहिलाच डाव 152 धावसंख्येवर रोखला. यामध्ये काईले व्हेरेने याने सर्वाधिक अशा 64 धावा केल्या. पुढे ऑस्ट्रेलियालाही पहिल्या डावाच्या पहिल्या चेंडूतच धक्का बसला. त्यानंतर विकेट्स पडतच राहिल्या. यामुळे त्यांचा पहिला डाव 218 धावसंख्येवरच संपुष्टात आला. या डावात ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 96 चेंडूत 92 धावा केल्या. दुसरीकडे गोलंदाजीत रबाडाने 4 विकेट्स घेतल्या.
It’s all over at The Gabba, inside two days!
Australia extend their lead at the top of the #WTC23 standings with a six-wicket win 📈
Watch the rest of the #AUSvSA series LIVE on https://t.co/CPDKNxoJ9v with a Full Tour Pass 📺 pic.twitter.com/OmeITaMEDs
— ICC (@ICC) December 18, 2022
दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डावही 99 धावांवरच संपला. यामुळे ऑस्ट्रेलियासमोर जिंकण्यासाठी केवळ 34 धावांचे सोपे लक्ष्य होते. हे लक्ष्य त्यांनी 7.5 षटकात गाठले मात्र त्यासाठी त्यांना 4 विकेट्स गमवाव्या लागल्या. यातील 19 धावा तर अतिरिक्त स्वरुपातच आल्या. त्या चारही विकेट्स रबाड़ाने घेतल्या. यामध्ये उस्मान ख्वाजा, डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि हेड यांचा समावेश आहे. त्याने ही कामगिरी 4 षटकात 13 धावा देत केली. मार्नस लॅब्यूशेन 5 धावांवर नाबाद राहिला.
विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यातील या सामन्याचा निकाल फक्त दोनच दिवसात लागला. या दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. Australia Chase Down 34 runs Target in First Test vs south Africa Kagiso Rabada spectacular Bowling
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हरभजन-अश्विनच्या बरोबरीला पोहोचला कुलदीप, बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत केला मोठा विक्रम
भारताविरुद्ध बांगलादेशची नेहमीच ‘कसोटी’, हरलेल्या सामन्यांची आकडेवारी धक्कादायक