ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेला ३ ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियासाठी बांगलादेशचा हा दौरा खास असणार आहे. कारण, या दौर्यात ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वाच्या वरिष्ठ खेळाडूंचा समावेश नाही. ऑस्ट्रेलिया संघाचा नियमित कर्णधार ऍरोन फिंच देखील या मालिकेत नसणार आहे. अशाच ऑस्ट्रेलियाने या दौर्यासाठी यष्टिरक्षक फलंदाज असलेला मॅथ्यू वेडकडे कर्णधारपद सोपवले आहे. याआधी नुकत्याच झालेल्या वेस्टइंडीज दौऱ्यात फिंचला दुखापत झाल्याने उर्वरित एकदिवसीय सामन्यात ॲलेक्स कॅरीला कर्णधारपद दिले होते.
या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचे ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांसारख्या महत्त्वाच्या खेळाडूंचा समावेश नसल्याने ऑस्ट्रेलियासाठी आणि खास करून नवीन कर्णधार मॅथ्यू वेडसाठी हा दौरा महत्त्वाचा असणार आहे. तसेच ही टी-२० मालिका ऑस्ट्रेलियाची टी-२० विश्वचषकापूर्वीची शेवटची मालिका आहे.
वेड म्हणाला काय म्हणाला?
‘संघात मधल्या फळीत मी फलंदाजी करण्याची शक्यता आहे. याबाबत निवडकर्ते जॉर्ज बेली आणि जस्टिन लँगर लवकरच अंतिम निर्णय स्पष्ट करतील. त्याचबरोबर टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने माझ्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल होऊ शकतात. मला वरच्या फळीत खेळावे लागले तरी खेळू शकतो. मात्र, तूर्तास मधल्या फळीत खेळण्यावर माझा जास्त भर असेल,’ असे वेड म्हणाला
टी२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश संघ खालील प्रमाणे –
ऑस्ट्रेलिया –
ऍस्टन अगर, वेस अगर, जेसन बेहरनडॉफ, ॲलेक्स कॅरी, डॅन क्रिश्चियन, जोश हेजलवूड, मोजिस हाॅन्रिक्स, मिशेल मार्श, बेन मेकडरमोट्ट, राईल मेरेडिथ, ऍस्टन टर्नर, अँड्र्यू टाय, मॅथ्यू वेड (कर्णधार) ॲडम झम्पा
बांगलादेश –
मोहम्मदुल्ला (कर्णधार), सौम्य सरकार, नईम शेख, शाकिब अल हसन, नुरुल हसन सोहान, आसिफ हुसेन, शमीम हुसेन, सैफुद्दीन, तस्किन अहमद, शोरीफूल इस्लाम, नासूम अहमद, मेहदी हसन, मुस्तफिजुर रहमान, मोहम्मद मिथुन, तैजूल इस्लाम, मुसाद्दीक हुसेन सैकत, रुबल हुसेन.
महत्वाच्या बातम्या –
–ट्विटरवर आमने-सामने आले पडद्यावरील आणि प्रत्यक्षातील ‘कबीर खान’; झाले ‘असे’ संभाषण
–टोकियो ऑलिम्पिक: सोमवारी ‘अशी’ राहिली भारताची कामगिरी; ११ व्या दिवसाचे असणार ‘असे’ वेळापत्रक
–भारताच्या ‘या’ शहरात बनतेय सर्वात मोठे हॉकी स्टेडियम, भूषवणार विश्वचषकाचे यजमानपद