---Advertisement---

पुजाराला ऑस्ट्रेलियन संघातर्फे 100 व्या कसोटीची ‘स्पेशल गिफ्ट’! खिलाडूवृत्तीने जिंकली मने

---Advertisement---

भारतीय संघाने रविवारी (दि. 19 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 6 गडी राखून मोठा विजय मिळवला. हा विजय मिळवताच भारतीय संघ चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडीवर पोहोचला. तसेच, बॉर्डर-गावसकर ट्रॉफी देखील भारताने आपल्याकडेच राखली. आपला शंभरावा सामना खेळत असलेला भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याच्यासाठी हा सामना संस्मरणीय ठरला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने देखील त्याचा योग्य सन्मान केला.

भारताकडून शंभर कसोटी सामने खेळणारा तेरावा खेळाडू होण्याचा मान पुजाराने मिळवला.‌ या सामन्याच्या पहिल्या डावात पुजारा अपयशी ठरला होता. दुसऱ्याच चेंडूवर तो पायचित झालेला. मात्र, दुसऱ्या डावात त्याने हे अपयश भरून काढले. दुसऱ्या डावात त्याने नाबाद 31 धावा जमवत भारताचा डाव देखील सांभाळला. भारतीय संघासाठी विजयी चौकार मारण्याचा मान देखील त्याला मिळाला.

 

हा सामना संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने पुजाराचा सन्मान केला. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने त्याला आपल्या संघातील सर्व सदस्यांची स्वाक्षरी असलेली जर्सी भेट दिली. मागील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फिरकीपटू नॅथन लायनने आपला शंभरावा कसोटी सामना खेळला होता. त्यावेळी भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे यानेही त्याला अशाच प्रकारे जर्सी भेट दिलेली.

पुजारा हा सध्या भारतीय संघातील दुसरा सर्वात अनुभवी फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत 100 कसोटी सामन्यांमध्ये 7052 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 44.07 अशी राहिली. तसेच त्याच्या नावे 19 शतकांची नोंद आहे. भारतीय संघाने दोन्ही वेळा ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत करण्याची कामगिरी केली होती. या दोन्ही विजयांमध्ये पुजाराचा सिंहाचा वाटा होता.

(Australia Cricket Team Gift Cheteshwar Pujara All Players Signed Jersey On His 100 Th Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! टीम इंडियाकडून 6 विकेट्सने ऑस्ट्रेलियाचा सुफडा साफ, 36 वर्षांच्या विक्रमाला धक्काही लागला नाही
किंग कोहलीचा भीम पराक्रम! 25000 धावांचा टप्पा पार करताच मोडला ‘मास्टर ब्लास्टर’चाही World Record

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---