‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स’चा 11 वा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. नॉर्थम्प्टनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 23 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं 20 षटकांत 5 गडी गमावून 199 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघ 6 गडी गमावून केवळ 176 धावाच करू शकला. भारताकडून युसूफ पठाणनं दमदार खेळी केली, पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही. ॲरॉन फिंच 10 चेंडूत 7 धावा करून अनुरीत सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. बेन डंकलाही 13 चेंडूत केवळ 17 धावा करता आल्या. मात्र, शॉन मार्श एक टोक धरून राहिला. त्यानं 27 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 41 धावांची शानदार खेळी केली. कॅलम फर्ग्युसननं 22 चेंडूत 26 धावा केल्या. याशिवाय डॅनियल ख्रिश्चननं 33 चेंडूंत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीनं 69 धावा ठोकत ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेलं. बेन कटिंग 13 चेंडूत 24 धावा करून नाबाद राहिला.
200 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाचा टॉप ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप ठरला. रॉबिन उथप्पानं 12, इरफान पठाणनं 9 आणि सुरेश रैनानं केवळ 12 धावा केल्या. कर्णधार युवराज सिंगलाही 18 चेंडूत केवळ 19 धावा करता आल्या. युसूफ पठाणनं खालच्या फळीत दमदार फलंदाजी केली. त्यानं 48 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 78 धावा ठोकल्या, मात्र तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. पवन नेगीनं 10 चेंडूत 11 धावा केल्या. अंबाती रायडू 17 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने 26 धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून पीटर सिडल आणि नॅथन कुल्टर-नाईलनं 2-2 बळी घेतले.
‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स’ मध्ये भारतीय संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
डेव्हिड वॉर्नरला निवृत्ती मागे घ्यायची आहे? सूचक इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाचं नेतृत्व कोण करणार? या 2 खेळाडूंची नावं चर्चेत
लाखो चाहत्यांचा हार्ट ब्रेक! स्मृति मंधानानं केला आपल्या बॉयफ्रेंडचा खुलासा, 5 वर्षांपासून आहेत दोघे एकत्र